बोथली येथील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:53 IST2019-06-05T21:53:15+5:302019-06-05T21:53:40+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे मागील वर्षी पाूसन पाण्याची भिषण टंचाई आहे. बोथली लगत असलेल्या खजरी येथील शेतातून बोथली येथील नागरिक पाणी आणून आपली गरज भागवित होते. तर काही नागरिक बैल बंडीने शेतातून पाणी आणून आपली गरज भागवित होते.

बोथली येथील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
खजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे मागील वर्षी पाूसन पाण्याची भिषण टंचाई आहे. बोथली लगत असलेल्या खजरी येथील शेतातून बोथली येथील नागरिक पाणी आणून आपली गरज भागवित होते. तर काही नागरिक बैल बंडीने शेतातून पाणी आणून आपली गरज भागवित होते. लोकमतने यासंबंधिचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ कामाला सुरुवात केली आहे.
गावातील पाणी टंचाई निवारणार्थ बोअरवेल अधिग्रहणसाठी प्रस्ताव तयार करुन ग्रामसभेच्या ठरावानिशी सरपंच नरेश चव्हाण याी प्रस्ताव बीडीओ, तहसीलदार, सीईओ नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या मदतीने कुवरलाल मांदाळे यांची बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आली. यासाठी येणारा सर्व खर्च शासन करणार आहे. विंधन विहिर अधिग्रहण करुन त्या बोअरवेलचे पाणी पुरवठा टँकमध्ये टाकून सर्व गावाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १४ व्या वित्त आयोगातून त्वरीत अनुसयाबाई चव्हाण यांच्या घराजवळ विंधन विहीर खोदण्यात आली. त्या विंधन विहिरीला पाणी लागल्याने तिही योजना यशस्वी झाली. तसेच टुनेश्वर मेश्राम यांच्या घराजवळील सौर ऊर्जा प्रकल्प बंद होता. त्या विंधन विहिरीतील बोअर काढून धन्साराम भोयर यांच्या घराजवळील विंधन विहिरीमध्ये मोटार टाकून तोही प्रकल्प सुरु करण्यात आला.त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे.