पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:09 PM2017-09-25T22:09:36+5:302017-09-25T22:09:49+5:30

भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे .....

Water management needs | पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

Next
ठळक मुद्देअभिमन्यू काळे : गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्राम हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत तीन दिवसीय गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, प्रशिक्षक म्हणून इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, कृषी सहायक डी.के.ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. सविता पवार, महेंद्र मेश्राम, तालुका कृषी अधिकारी निरज जागरे, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक मनोहर वाकडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी काळे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी जलयुक्त शिवार अभियानाची गरज आणि वैशिष्ट्ये, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विविध समित्यांची रचना व कार्यपध्दती, क्षेत्रीय उपचाराची माहिती, पाण्याचे अंदाजपत्रक, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गावाचा आराखडा तयार करणे, जल व्यवस्थापन व तयार मतांची देखभाल दुरुस्ती व हस्तांतरण अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला गोंदिया तालुक्यांतर्गत १० गावातील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड झालेल्या गावातील सरपंच, महिला प्रतिनिधी, उपसरपंच, ग्राम कार्यकर्ता, प्रगतीशील शेतकरी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कृषी मित्र व ग्रामसेवक उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान क्षेत्रभेट दाखविण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी मार्गदर्शक पुस्तीका व प्रमाणपत्र देण्यात आले.
संचालन ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजा पटले, पूर्णप्रकाश कुथेकर, विशाल मेश्राम, गौतम बोरकर व कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Water management needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.