शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 2, 2015 23:07 IST

सडक अर्जुनी तालुका होवून १७ वर्षे झालीत, पण तालुक्याला अद्याप बस स्थानक झाले नाही. सुदैवाने आता जिल्ह्याचे पालकमंत्री याच गावचे रहिवासी लाभले आहेत. त्यामुळे आतातरी येथील

सडक-अर्जुनी : सडक अर्जुनी तालुका होवून १७ वर्षे झालीत, पण तालुक्याला अद्याप बस स्थानक झाले नाही. सुदैवाने आता जिल्ह्याचे पालकमंत्री याच गावचे रहिवासी लाभले आहेत. त्यामुळे आतातरी येथील बस स्थानकाची समस्या मार्गी लागेल अशी सर्वांना आशा आहे.सडक येथे तीन ठिकाणी बस थांबे दिले आहेत. त्यात प्रेम शंकर भिवगडे, दुर्गा चौक व लोकेश बारसागडे यांचे सॉ मिल जवळ बस थांबे दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यात आठ ही तालुक्यात स्वतंत्र बस स्थानक तयार केले आहेत. गेल्या ८ दिवसापूर्वी अर्जुनी मोरगाव येथे नवीन भव्य बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. सडक अर्जुनी तालुक्यात १०८ गावे येतात. लोकसंख्या १ लाख सात हजार ४९३ आहे. या लोकांचे आवगमन होत असते. पण साधे बस थांब्यावर उभे राहण्यासाठी निवारा नाही, ही सडक अर्जुनीची शोकांतिका आहे. सडक अर्जुनीच्या मुख्य बस थांब्यावर तालुक्यातील महिला, पुरुष, मुले-मुली प्रवास करतात. पण मुतारीघर नसल्यामुळे महिला व पुरूष प्रवासांना सापडेल त्या जागी मूत्र विसर्जन करून पुढे जावे लागते. महिला मंडळीची फारच कुचंबणा होताना दिसत आहे. गोंदिया बस आगार प्रमुख गौतम शेंडे यांनी लक्ष देवून मुतारी घरांची सुविधा केली पाहिजे. जुना बस थांबा आहे. पडके शेडही आहेस पण सफाई कामगार नसल्यामुळे नेहमीच अस्वच्छता दिसत आहे. बस थांब्याचे शेडमध्ये विद्यार्थी पास कार्यालयाचे स्थापना एक वर्षापासून करण्यात आली. ह्या पास कार्यालयामुळे तालुक्यातील शाळेचे मुला मुलींना व पास घेवून भ्रमण करणाऱ्या नागरिकांना सडक अर्जुनी येथूनच पास देण्याची सुविधा फारच लाभदायक आहे. कार्यालय म्हटले तर त्या कार्यालयात विज पाणी व मुतारी घराची नितांत गरज राहते. पण वेळकाढू अधिकाऱ्यांचे दुर्लक्षते पणामुळे ही समस्या नेहमीच भडेसावत आहे. तालुक्याचे मुख्य बस थांबा आहे. त्याचे बाजूला कार्यालय ही आहे. त्यासाठी जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बस आगार विभागाकडून वाटर फिल्टर लावण्याचे सौजन्य दाखविले पाहिजे. विजेची सोय नसल्यामुळे ह्या बस थांब्याजवळ रात्रीचे वेळी अंधाराचे साम्राज्य पसरला असते. विज नसल्यामुळे त्या विद्यार्थी पास कार्यालयात दिवसा अंधार राहत असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सडक अर्जुनीच्या तालुक्याचा बस स्थानकाची समस्या जिल्ह्याचे अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनी लक्ष देवून भव्य बस स्थानकाची कल्पना मनात आणावी असे वाटते. (शहर प्रतिनिधी)