शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रांना मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाची शासकीय धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत असल्याने प्रती क्विंटलमागे दोनशे ते तिनशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देशेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात : प्रती क्विंटलमागे बसतोय शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी करुन धान बाजारपेठेत विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाची शासकीय धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत असल्याने प्रती क्विंटलमागे दोनशे ते तिनशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. धान हे या भागातील मुख्य पीक असून यावरच या जिल्ह्यातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शासनाने यंदा धानाला १८३५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावापेक्षा शेतकºयांना कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची ५६ आणि आदिवासी विकास महामंडळाची ४४ अशी एकूण १०० शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केली जातात. यामुळे शेतकºयांचे नुकसान होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. दिवाळीच्या पूर्वीच धान खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. दिवाळीपूर्वी शेतकरी हलक्या धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करतात व उधार उसणवारी फेडण्याचा प्रयत्न करतात. मात्र यंदा हलके धान बाजारपेठेत विक्रीस येण्यास सुरूवात झाली तरी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाºयांना प्रती क्विंटल दोनशे ते तिनशे रुपये कमी दराने धानाची विक्री करावी लागत आहे. यासंदर्भात या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरीचे प्रस्ताव शासन आणि जिल्हाधिकाºयांकडे पाठविले आहे.मात्र त्याला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. येत्या दोन तीन दिवसात धान खरेदी केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले.५० लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्टआदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा जिल्ह्यातील धान पिकांची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ५० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी सुध्दा या दोन्ही विभागाने ३९ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. धानाची खरेदी केंद्रावर होणार आवक लक्षात घेऊन या दोन्ही विभागाने तसे नियोजन केले आहे.केंद्राना मंजुरी मिळण्यास विलंब का?दिवाळीपूर्वीपासूनच बाजारपेठेत हलक्या धानाची आवक सुरू होते. याची कल्पना या दोन्ही विभाग आणि शासनाला आहे. मात्र यानंतरही यंदा शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडून विलंब का केला जात असा सवाल शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.पाखड धानाची समस्या भेडसावणारयंदा परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील कापणी केलेल्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. धानाच्या कडपा पाण्यात भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पाखड धानाची समस्या शेतकºयांना भेडसाविण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Marketबाजार