गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:20+5:30
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामाली शाळा ही या मंडळाला संलग्नीत असल्यामुळे शिकविला जाणारा अभ्यासक्रम बंद होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.

गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळ शासन बंद करणार असल्याने तालुक्यातील हिरडामाली व गोरेगाव या दोन आंतरराष्ट्रीय शाळा बंद होणार आहेत. याच्या निषेर्धात हिरडामाली येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकºयांनी शनिवारी (दि.२९) सकाळी ७.३० वाजता शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामाली शाळा ही या मंडळाला संलग्नीत असल्यामुळे शिकविला जाणारा अभ्यासक्रम बंद होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. या शाळांमध्ये गुणवत्यापूर्ण शिक्षण दिले जात असल्याने गोरगरीब पालकांना मदत होत आहे.
गोरगरिबांची मुले महागड्या शाळेत शिक्षण घेऊ शकत नाही. अशावेळी आंतरराष्ट्रीय शाळा उत्तम पर्याय होता. पण शासनाने आंतरराष्ट्रीय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद होणार असल्याने हिरडामाली येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकºयांनी शनिवारला शाळेला कुलूप ठोकून शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली. शनिवारपासून शाळा बंद ठेवण्यात येणार असून ४ मार्चपर्यंत शासनाने आपला निर्णय मागे न घेतल्यास गोंदिया-गोरेगाव मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकल्याची माहीती मिळताच गटशिक्षणाधिकारी प्रदीप भेंडारकर, विषयतज्ञ सुनील ठाकूर यांनी भेट देऊन गावकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत हिरडामाली येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकºयांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पूर्ववत सुरू ठेवावे अशी मागणी निवेदनातून केली. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राखीलाल येळे, रामू हरिणखेडे, पप्पू हरिणखेडे, गुलाब सोनुले, संजय नेवारे, महेंद्र चौधरी, नंदलाल बिसेन, संतोष बिसेन, दशरथ टंभरे, हिवराज पटले, अनिल बिसेन, राजेश वाघाडे, एकता कटरे, हौसलाल कटरे, देवेंद्र रहांगडाले, राशीलाल भोंडे, पांडूूरंग बोपचे, रितीक येळे, भारती पटले उपस्थित होते.
हिरडामाली येथील आंतरराष्ट्रीय शाळा बंद होणार आहे किंवा मंडळाला संलग्नीत अभ्यासक्र बंद होणार आहे याविषयी अधिकृत माहिती नाही. शासनाकडून असे कुठलेही पत्रक प्राप्त झाले नाही.
- प्रदीप भेंडारकर, गटशिक्षणाधिकारी गोरेगाव