शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:13 IST

मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसाने केले खूश : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता आतापर्यंत सरासरी ६४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.असे असताना मात्र वरुण राजाची नाराजी जिल्ह्याला चांगलीच भोवली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे बघता अद्याप सरासरी २८४ मिमी पावसाची तूट कायम आहे.जून महिना कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यातही पावसाने अपेक्षापूर्ती केली नाही.पंधरावडाभर दडी मारल्यानंतर मागील तीन दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात परतून आला आहे.या पावसामुळे शेतकºयाला थोडाफार दिलासा मिळाला असून तो शेतीच्या कामाला पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी अडकून पडली होती.तर नर्सरीही वाळत आल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळाले.अशात या पावसामुळे शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे.पावसाच्या या खेळीने आता उशीर झाला असतानाही शेतकरी एका आशेने आपल्या शेतीत जुंपल्याचे दिसून येत आहे.असे असताना आजही दमदार पावसाची गरज आहे.जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेचमागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने आजही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत नाममात्र पाणीसाठा आहे. हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांवर नजर टाकल्यास मागील २९ जुलैपर्यंत इटियाडोह प्रकल्पात १५२.६८ दलघमी (४८.०३ टक्के) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ८४.५१ दलघमी (२६.५८ टक्के) पाणीसाठा आहे.सिरपूर प्रकल्पात मागील वर्षी ४२.७५ दलघमी (२६.७५ टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३६.५८ दलघमी (२२.९० टक्के) पाणीसाठा आहे. पूजारीटोला प्रकल्पात मागील वर्षी ३२.५६ दलघमी (७४.८० टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३२.५६ दलघमी (२०.१४ टक्के) पाणीसाठा असून कालीसराड प्रकल्पात मागील वर्षी १८.१९ दलघमी (७०.८६ टक्के ) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ३.८१ दलघमी (१४.६४ टक्के) पाणीसाठा आहे.पावसाळ््यात प्रकल्पांची ही स्थिती असल्यास दमदार पाऊस न बरसल्यास येणारा उन्हाळा मात्र कसा राहणार याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.