मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला भाजी विक्रेत्यांचा ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST2021-04-26T04:26:22+5:302021-04-26T04:26:22+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी भाजीबाजार इंदिरा गांधी क्रीडा संकुल व रामनगर येथील मनोहर म्युनिसिपल ...

मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला भाजी विक्रेत्यांचा ‘खो’
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी भाजीबाजार इंदिरा गांधी क्रीडा संकुल व रामनगर येथील मनोहर म्युनिसिपल शाळेत स्थानांतरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाला चक्क भाजी विक्रेत्यांनी ‘खो’ देत जुन्याच ठिकाणी, तसेच काहींनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परिणामी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी एक आदेश काढून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी काही दिवस भाजी बाजार नियोजित ठिकाणी स्थानांतरित करण्याचे आदेश काढले होते. मात्र, भाजी विक्रेत्यांनी उन्हाचे कारण पुढे करून तिथे जाण्यास टाळाटाळ केल्याची माहिती आहे. असे असले तरी एक प्रकारे भाजी विक्रेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘खो’ देण्याचे चित्र दिसत आहे.
बॉक्स
ठोक विक्रेत्यांच्या बंदवर प्रश्नचिन्ह
ठोक भाजी विक्रेत्यांनी ३० एप्रिलपर्यंत व्यवहार पूर्ण बंद राहील असे आदेश काढले आहेत. मात्र, त्या आदेशाचा पूर्णविचार करून ठोक विक्रेत्यांनी भाजी बाजार सुरू ठेवावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मात्र, सोशल मीडियावर येत असलेल्या संदेशावरून ठोक भाजी विक्रेते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.