शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

ठिंबक सिंचनातून ‘खोबा’ बनले भाजी उत्पादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:42 IST

सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य

आत्मा प्रकल्पाची मदत : १४५ क्विंटल उत्पादनातून १.३० लाखांचे उत्पन्नदेवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य मिळत असेल तर ओसाड भूमिमध्येसुद्धा पीक घेतले जावू शकते. हा यशस्वी प्रयोग देवरी तालुक्यातील कवलेवाडा-पिंडकेपार येथील शेतकरी हिरालाल लहानू खोबा यांनी सिद्ध करून दाखवून शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. कृषी विभागाद्वारे २०१३-१४ मध्ये तालुक्याच्या सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाच्या आधारावर भाजीपाला लागवडीसाठी निवड करण्यात आली. तालुक्यात प्रशिक्षणाचे आयोजन करून भाजीची शेती करण्यासाठी जानजागृती करण्यात आली. शेती शाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाने हिरालाल यांना शहरी क्षेत्रात भाजी पुरवठा योजनेचे महत्व पटवून दिले. ठिंबक सिंचन योजनेतून पाण्याच्या बचतीबाबत माहिती देण्यात आली. खोबा यांना भाजीच्या शेतीसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले. त्यांनी आत्मा अंतर्गत जैन इरिगेशनचा दौरा करून तेथील ठिंबक सिंचनाचे प्रशिक्षण घेतले. तसेच वाराणसी येथेसुद्धा जावून प्रशिक्षण घेतले. खोबा यांच्या शेताचा दौरा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्य काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी. शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माचे संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. सर्व अधिकारी चिखलाची तमा न बाळगता खोबा यांच्या शेतात गेले व भाजी शेतीचे निरीक्षण केले. पारंपरिक धान शेतीला बगल देवून खोबा यांनी भाजीपाल्याची लागवड करुन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवल्याबद्दल कौतुक केले. पूर्वी धानाचे पीककवलेवाडा येथील खोबा सुरूवातीला ते धानाची शेती करीत होते. त्यात नफा होत नसल्याने त्यांनी सुधारित तंत्राचा अभ्यास केला. कमी वेळेत व कमी पाण्यात अधिक लाभासाठी ठिंबक सिंचनातून भाजीपाला पीक लावण्याचा निर्धार केला. ०.८० हेक्टरमध्ये ठिंबक सिंचानाचे यंत्र बसविले. त्यावर त्यांनी ६२ हजार ०१७ रूपयांचा खर्च केला. ठिंबक सिंचनातून त्यांनी वांगी, टमाटर, भेंडी, कारले व चवळीच्या शेंगाची लागवड केली. खत-बियाणे व औषधांवर ३० हजार रूपये खर्च झाले. या हंगामात ऋतूत त्यांनी ३० क्विंटल भिंडी, ५० क्विंटल वांगी, ४० क्विंटल टमाटर, १० क्विंटल चवळी व १५ क्विंटल वालाचे उत्पादन घेवून एक लाख ३० हजार रूपयांच्या भाजीपाल्याची विक्री केली. त्यांना एक लाख रूपयांचा नफा झाला.आठवड्यातून चार बाजारखोबा यांनी सांगितल्यानुसार, ते पूर्वी चार एकरात धान शेती करीत होते. आता पाऊन एकरमध्ये भाजी पीक घेतले जात आहे. आठवड्यातून चार वेळा ते आपले उत्पादन बाजारात नेतात. प्रत्येक वेळी तीन हजार रूपयांची विक्री होते. भाजीला लागणाऱ्या पाण्यासाठी १०० फूट खोल बोअरवेल खोदली. अशाच प्रकारे परसराम गरीबसिंह बागडेरिया यांनीसुद्धा एक एकरमध्ये भाजीचे पीक लावले आहे. त्यांना ५० हजार रूपयांचा लाभ मिळत आहे. खोबा यांच्यानुसार, शासनाद्वारे काही मदत देण्यात आली नाही. राहण्यासाठी व्यवस्था नाही. शेतीच्या कंपाऊंडसाठी तारांची आवश्यकता आहे.