विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:26 IST2017-10-11T00:26:34+5:302017-10-11T00:26:44+5:30

वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी/मोरगाव अंतर्गत येणाºया धाबेटेकडी, वडेगाव, बोंडगावदेवी, महागाव सहवनक्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीवाची प्रबोधनात्मक माहिती दिली.

Various activities celebrate Wildlife Week | विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

ठळक मुद्देरॅलीच्या माध्यमातून जनजागृती : पक्षी निरीक्षण व गणनेत विद्यार्थी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी/मोरगाव अंतर्गत येणाºया धाबेटेकडी, वडेगाव, बोंडगावदेवी, महागाव सहवनक्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीवाची प्रबोधनात्मक माहिती दिली. वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
गावकºयांना वनाबद्दल आकर्षण निर्माण होऊन वनसंपतीचे तसेच वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, प्रत्येक मानवाला वनसंपत्तीविषयी आपुलकी असावी या हेतूने सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचे वृक्ष प्रेम जागृत होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या वन रॅलीच्या माध्यमातून गावागावातील लोकांना वन्यजीवाबद्दल जागृती करण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात सर्वप्रथम वृक्षवल्लीची पूजापाठ वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आली.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बोंगावदेवी सहवनक्षेत्रामधील तिडका भाग ३ बिटामध्ये वनरक्षक एन.एन. पंधरे यांच्या पुढाकाराने वन्यजीव सप्ताहाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. शालेय विद्यार्थी व वनसमिती पदाधिकाºयांसह वन्यजीव सप्ताहाप्रित्यर्थ गावातून रॅली काढून गावकºयांना वनाबद्दल माहिती देऊन जागृत करण्यात आली. वन्यजीव सप्ताहाच्या तिसºया दिवशी माहुरकुडा येथील तलाव तसेच सुरबंधतलाव या ठिकाणी सायंकाळी पक्षी गणना करुन निरीक्षण करण्यात आले. यावेळी वनक्षेत्राधिकारी रहांगडाले, आगासे, पी.एम. राऊत व इतर वनकर्मचारी उपस्थित होते. चवथ्या दिवशी झरपडा येथे डॉ. होमी भाभा विद्यालय, येथील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारीºयांनी वनरॅली काढली.
वृक्ष लागवड करण्यात आलेल्या मिश्ररोपवनात विद्यार्थ्यांना आणून वन्यजीवाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी क्षेत्र सहायक खडसे, राऊत, नागपुरे, भाभा विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. ५ व्या दिवशी वन्यजीव सप्ताह निमित्त इटखेडा येथील स्वामी विवेकानंद विद्यालय इसापूर- ईटखेडा हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी क्षेत्र सहायक पी.एम. केळवतकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीव व निसर्ग संपत्तीचे मार्गदर्शन केले. यावेळी वनरक्षक पी.एम. राऊत, चांदेवार, भैसारे, टेंभरे, पारिसे, सांगोळे इत्यादी वनकर्मचारी उपस्थित होते. सहाव्या दिवशी बोंडगावदेवी सहवनक्षेत्रातील बोदरा-देऊळगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या वतीने गावामधून वनरॅली काढण्यात आली. गावकºयांना वन्यजीवांचे आकलन करुन देण्यात आले. क्षेत्र सहाय्यक एम.एम. धुर्वे, वनरक्षक दहिवले, पंधरे, राजश्री राजगिरे, डोंगरे याप्रसंगी उपस्थित राहून गावकºयांना वनाची महत्ती सांगण्यात आली. वन्यजीव सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी वनक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली धाबेटेकडी येथे संयुक्त वनव्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली. वन्यजीव सप्ताहानिमित्त अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात ७ दिवस कार्यक्रम घेवून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

Web Title: Various activities celebrate Wildlife Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.