दोन चोरट्यांकडून दोन मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:21+5:302021-01-13T05:15:21+5:30
गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी गणेशनगर, एलआयसी ऑफिससमोर, प्रिन्स गॅरेज व सर्कस ग्राऊंड गोंदिया येथून पळवून ...

दोन चोरट्यांकडून दोन मोटारसायकल जप्त
गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी गणेशनगर, एलआयसी ऑफिससमोर, प्रिन्स गॅरेज व सर्कस ग्राऊंड गोंदिया येथून पळवून नेलेल्या मोटारसायकल चोरीतील दोन आरोपींना अटक केली आहे. पळवून नेलेल्या दोन मोटारसायकलींची किंमत १ लाख रुपये आहेे. त्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ७ जानेवारी रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशनगरातील राम शंकरलाल अग्रवाल (वय ३६, रा. गणेशनगर, गोंदिया) यांच्या एमएच ३५ एएफ ५५४५ या मोटारसायकलची किंमत ४० हजार आहे ती जप्त केली. ही मोटारसायकल २ जानेवारी रोजी चोरून नेण्यात आली होती. लखपती बस्ताराम फेंडर (वय २६, रा. वाॅर्ड क्र. १३ वाराशिवनी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) याला भंडारा जिल्ह्याच्या वाहनी येथून अटक करण्यात आली. दुसरा आरोपी अनमोल रमेश ऊके (रा. गराडा, ता. तिरोडा) याच्याकडून एमएच ३५ एएन ९८९६ किंमत ६० हजार ही जप्त करण्यात आली. ही मोटारसायकल ९ जानेवारी रोजी जप्त करण्यात आली. या आरोपींकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे, पोलीस नायक जागेश्वर उईके, ओमेश्वर मेश्राम, योगेश बिसेन, प्रमोद चव्हाण, दीपक रहांगडाले, संतोष बोपचे, गजानन चव्हाण, सतीश शेंडे, विनोद शहारे, छगन विठ्ठले यांनी केली आहे.