शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांचे वेतन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लेखाशिर्षाच्या गोंधळाने बराच गाजला होता. या गोंधळामुळे शिक्षकांचे वेतन कोषागार व वेतन पथक कार्यालयात अडले होते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने कुठलीही हालचाल किंवा उपाय योजना केली नाही.

ठळक मुद्दे६५ खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांंची कोंडी : शिक्षण विभागाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ६५ खासगी प्राथमिक शाळेतील २८० शिक्षकांचे वेतन शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे.यामुळे सणासुदीच्या काळात शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लेखाशिर्षाच्या गोंधळाने बराच गाजला होता. या गोंधळामुळे शिक्षकांचे वेतन कोषागार व वेतन पथक कार्यालयात अडले होते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने कुठलीही हालचाल किंवा उपाय योजना केली नाही. अखेर विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदिया च्यावतीने लेखाशिर्षाच्या गोंधळा संदर्भात १९ आॅगस्टला लेखाअधिकारी कार्यालय, विभागीय कोषागार कार्यालय नागपूर व शिक्षण उपसंचालक कार्यालयात भेट देऊन हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.वेतनाच्या समस्येबाबत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदियाचे जिल्हा संगठन प्रमुख बालकृष्ण बालपांडे, संगठन सचिव पंचभाई, उपाध्यक्ष अभिषेक अग्रवाल, वेतन पथक प्रतिनिधी बरडे, कोषागार प्रतिनिधी मेश्राम, संघाचे अध्यक्ष मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बढिये या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे जुलै महिन्याचे पगार २५ तारखेपर्यंत होणार असे आश्वासन तिन्ही कार्यालय प्रमुखांनी दिले होते. गोंदिया वेतन पथक कार्यालयातील कर्मचाऱ्यांसंबधी शिक्षण उपसंचालक मेंढे व वरिष्ठ लेखाधिकारी काळे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती समजून सांगितली. तेव्हा लवकरच कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आले होते.या भेटीनंतर शिक्षण विभाग गोंदियातर्फे शिक्षकांच्या वेतनासंदर्भात कुठलीही अपेक्षित कार्यवाही केली नाही. तसेच गोंदिया वेतन पथक कार्यालयातर्फे वेतनाचे संभाव्य बजेट सुध्दा पुणे येथील कार्यालयात सादर केले नाही.त्यामुळे शिक्षकांच्या पुढील महिन्याच्या वेतनासाठी निधी उपलब्ध झाला नाही. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करण्यात यावे असे आदेश आहे. पण यानंतरही शिक्षण विभाग गोंदियाच्या लेटलतीफ कार्यामुळे शिक्षकांच्या वेतनाला विलंब होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात दोन दोन महिन्याचे वेतन थकले असल्याने शिक्षकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. प्राथमिक शिक्षकांचे थकीत दोन महिन्याचे वेतन तातडीने अदा न केल्यास कुटुंबीयांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाने दिला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक