शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कारसह दोन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्ह्यातून एका कारमध्ये भरून दारूच्या बाटल्या येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज ठाण्याचे पथक सिंधी भवनजवळील मार्गावर सापळा लावून बसले होते.

ठळक मुद्देदेशी-विदेशीचा समावेश : देसाईगंज पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गोंदिया जिल्ह्यातून दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत येत असलेली देशी-विदेशी दारू देसाईगंज पोलिसांनी सलग दुसऱ्यांही दिवशी जप्त केली. यात कारसह देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवारच्या रात्री करण्यात आली.गोंदिया जिल्ह्यातून एका कारमध्ये भरून दारूच्या बाटल्या येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज ठाण्याचे पथक सिंधी भवनजवळील मार्गावर सापळा लावून बसले होते.दरम्यान एमएच ३०, एए ३३३१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार येताना दिसली. त्या कारला थांबवून तपासणी केली असता त्यात देशी दारू सुप्रिम नं.१ या कंपनीच्या ९० मिलीच्या ३१०० सिलबंद बाटल्या (किंमत १,८९,००० रुपये), इंपेरियल ब्ल्यू या विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्या (किंमत १२,००० रुपये) आणि मारूती सुझुकी कंपनीची कार (किंमत ४ लाख) असा एकूण ५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच वाहनचालक नितीन विश्वमित्र शर्मा रा.देसाईगंज याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, हवालदार वासुदेव अलोणे, भावेश वरगंटीवार, श्रीकृष्ण जुवारे, अमोल पोटवार आदींनी केली.सोमवारच्या रात्री एका मालवाहू वाहनातून येणाऱ्या दारूच्या बाटल्या जप्त केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच मार्गावरून दारू वाहतूक झाल्यामुळे या व्यवसायात अनेक दारू तस्कर गुंतले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी