दुचाकीची बसला धडक, दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST2020-12-24T05:00:00+5:302020-12-24T05:00:21+5:30
प्राप्त माहितीनुसार प्रदीप, रुपचंद आणि विनोद हे तिघेही दुचाकी क्रमांक एम.एच.३३ आर ८६४० ने हे सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेढी येथे विवाह सोहळा आटोपून गोंदियाकडून-काेहमाराकडे जात होते. दरम्यान कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४० वाय ५२०८ ला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकी घासत जावून बसच्या खाली आल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे बसला सुध्दा आग लागली.

दुचाकीची बसला धडक, दोन जण ठार
लाेकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : भरधाव दुचाकीने विरुध्द दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील सडक अर्जुनी येथील आर.के.पेट्रोल पंपसमोर घडली. प्रदीप अवरासे (२६), रुपचंद प्रधान (२६) रा. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे. तर विनोद प्रधान (३८) असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रदीप, रुपचंद आणि विनोद हे तिघेही दुचाकी क्रमांक एम.एच.३३ आर ८६४० ने हे सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेढी येथे विवाह सोहळा आटोपून गोंदियाकडून-काेहमाराकडे जात होते. दरम्यान कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४० वाय ५२०८ ला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकी घासत जावून बसच्या खाली आल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे बसला सुध्दा आग लागली.
दरम्यान बस चालकाने प्रसंगावधान दाखवित बसमधील अग्निशमने यंत्रणा आग विझविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत प्रदीप अवरासे, रुपचंद प्रधान यांचा घटना स्थळी मृत्यू झाला. तर विनोद प्रधान हे गंभीर जखमी झाले. त्यांना घटनास्थळवर उपस्थित नागरिकांनी जखमीला सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.