भरधाव पिकअपची दुचाकीला धडक दोन जण ठार, आमगाव गोंदिया मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 22:24 IST2025-10-27T22:24:25+5:302025-10-27T22:24:58+5:30
पिकअप चालक घटनास्थळावरुन पसार

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक दोन जण ठार, आमगाव गोंदिया मार्गावरील घटना
गोंदिया : भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत २ जण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.२७) रात्री ८ वाजताच्या सुमारास आमगाव-गोंदिया मार्गावरील ठाणा येथील आदिवासी आश्रमशाळेजवळ घडली. सुरेश मोतीराम भोयर व कार्तीक मुलचंद राऊत रा. कारंजा असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुरज आणि त्याचा मित्र राऊत हे त्यांच्या दुचाकीने सोमवारी रात्री आमगाववरुन गोंदियाकडे येत होते. दरम्यान ठाणा जवळील आदिवासी आश्रमशाळेजवळ गोंदियाकडून आमगावकडे येणाऱ्या भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की दुचाकीस्वार दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. तसेच या अपघाताची
माहिती आमगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा तपास ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजू गजापूरे करीत आहेत.