शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यात गुंतागुंत वाढली

By admin | Updated: October 18, 2014 01:39 IST

अनेक पक्षांनी दावेदारी असणाऱ्या उमेदवारांना तिकीट नाकारले. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत काहींनी दुसऱ्या पक्षाचे तिकीट...

तिरोडा : अनेक पक्षांनी दावेदारी असणाऱ्या उमेदवारांना तिकीट नाकारले. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत काहींनी दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन तर काहींनी बंडखोरी करून अपक्ष लढणे पसंत केले. या प्रकारामुळे नाराज झालेल्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार न करता दुसऱ्यांना साथ दिली. यामुळे एकूण गुंतागुंतीच्या झालेल्या या निवडणुकीत जय-पराजय कुणाचा हे ठरविणे अत्यंत कठीण झाले आहे.तिरोडा विधानसभा क्षेत्रात तिरोडा तालुका व गोरेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. यात मुख्य लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पी.जी. कटरे, शिवसेनेचे पंचम बिसेन, बहुजन समाज पक्षाचे दीपक हिरापुरे, भाजपचे विजय रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर व अपक्ष दिलीप बन्सोड यांच्यात झाली. पी.जी. कटरे यांचे राहणे गोरेगावातील असून ते गोरेगाव तालुक्यातील एकमेव उमेदवार होते. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील अधित मते त्यांच्याच पारड्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु काँग्रेसचीच उमेदवारी मिळविण्यासाठी उत्सुक असलेले तिरोडा तालुक्याचे राधेलाल पटले व योगेंद्र भगत यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा या क्षेत्रात होती. याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. भाजप पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी सज्ज असताना आ. खुशाल बोपचे यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सक्रीयता दाखविली नाही. दुसरी बाब म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले व कधी भाजपचेच असलेले पंचम बिसेन यांनाही शिवसेनेच्या तिकिटावर लढणे पसंत केले.