विद्युत मीटरअभावी ट्रॉफीकला ‘रेड सिग्नल’
By Admin | Updated: November 26, 2014 23:08 IST2014-11-26T23:08:10+5:302014-11-26T23:08:10+5:30
गोंदिया शहरातील विस्कळीत वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागातर्फे शहराच्या मुख्य चौकात ट्रॉफीस सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र या ट्रॉफीस सिग्नलला दीड महिन्यापासून

विद्युत मीटरअभावी ट्रॉफीकला ‘रेड सिग्नल’
गोंदिया : गोंदिया शहरातील विस्कळीत वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागातर्फे शहराच्या मुख्य चौकात ट्रॉफीस सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र या ट्रॉफीस सिग्नलला दीड महिन्यापासून विद्युत मिटर न मिळाल्यामुळे या ट्राफिक सिग्नलला अद्याप ‘ग्रिन सिग्नल’ मिळालेला नाही.
शहरातील वाहनांची रेलचेल व अरूंद रस्ते यामुळे वाहतुकीची कोंडी व्हायची. शालेय अल्पवयीन विद्यार्थी बेधुंद वाहन हाकून इतर वाहन चालकांना दचका देत होते. यामुळे गोंदिया शहरातील अपघाताचे प्रमाण वाढत होते. अनियंत्रीत वाहतूृक व वाढत्या अपघाताना लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून जयस्तंभ चौक, नेहरू चौक व शक्ती चौक या तीन ठिकाणी ट्रॉफीक सिग्नल बसविण्यात आले. हे सिग्नल दिवाळीनंतर लगेचच सुरू होणार होते. परंतु विद्युत विभागाकडून मिटर न मिळाल्यामुळे हे ट्रॉफिक सिग्नल सुरू झाले नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अद्याप पैसे भरण्यात न आल्यामुळे विद्युत वितरण विभागाने मिटर दिले नसल्याची माहिती आहे. एका मिटरसाठी दोन हजार रुपये असे तीन ठिकाणसाठी सहा हजार रुपये भरावे लागणार आहे.(तालुका प्रतिनिधी)