शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

आदिवासी महामंडळाची धान खरेदी आली वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 5:00 AM

मार्केटिंग फेडरेशनच्या काही संस्थांनी गावागावात जाऊन थोड्या थोड्या प्रमाणात जागा मिळेल तिथे धान खरेदी करण्याचा विचार केला आहे. आदिवासी विकास महामंडळाने तर सपशेल हात वर केले आहेत. त्यांच्याकडे गोदाम उपलब्ध नसून आदिवासी क्षेत्रात इतरही विकल्प उपलब्ध नाही आहेत. या सर्व प्रकारामुळे आता गरीब आदिवासी शेतकरी कोंडीत सापडलेला दिसत आहे. 

ठळक मुद्देशासनाचे आदेश उघड्यावर धान खरेदी करू नये : गोदाम नसल्याने शेतकरी सापडला कोंडीत

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा :  जेथे धान खरेदीसाठी अभिकर्ता सदस्यांकडे गोदामे उपलब्ध आहेत. अशा खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर धान खरेदी करू नये, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी काढले आहे. या आदेशामुळे १ जून रोजी सुरू होणारी रब्बी हंगामातील धान खरेदी वांद्यात आली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या काही संस्थांनी गावागावात जाऊन थोड्या थोड्या प्रमाणात जागा मिळेल तिथे धान खरेदी करण्याचा विचार केला आहे. आदिवासी विकास महामंडळाने तर सपशेल हात वर केले आहेत. त्यांच्याकडे गोदाम उपलब्ध नसून आदिवासी क्षेत्रात इतरही विकल्प उपलब्ध नाही आहेत. या सर्व प्रकारामुळे आता गरीब आदिवासी शेतकरी कोंडीत सापडलेला दिसत आहे. गैरआदिवासी शेतकरी कोंडीत सापडलेला दिसत आहे. गैरआदिवासी क्षेत्रातही धान विक्रीसाठी मारामारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई अद्याप सुरू झाली नसल्याने मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातर्फे खरेदी केलेला धान तसाच पडून आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी केलेला धान पूर्णपणे उघड्यावर ताडपत्रीच्या भरवशावर जमा करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ - पावसाळा येऊन ठेपला तरी धानाची उचल झाली नाही. १ जूनपासून रब्बी पिकाच्या धानाची खरेदी सुरू करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे. परंतु धान संग्रहित करून ठेवावे तरी कुठे ही मोठी समस्या आहे. तर मोठ्या परिश्रमाने पिकवलेले धान विकावे कुठे आणि ठेवावे कुठे या अडचणीत शेतकरी सापडला आहे.  

खरिपातील धानाची उचल का नाही?- खरीप हंगामात खरेदी केलेला आदिवासी महामंडळाचा देवरी उपविभागाअंतर्गत एकूण २८ केंद्रांवर ६ लाख ७० हजार १६९ क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. तसेच मार्केटिंग फेडरेशनचे धानसुद्धा पडून आहे. दरवर्षी खरेदी पाठोपाठ धानाची उचलसुद्धा व्हायची ती यंदा का केली जात नाही. हा प्रश्न प्रत्येकाला पडला असून सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. खरिपाची तयारी करायची की रब्बीचे धान विक्री करण्यासाठी पायपीट, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

कोणत्याही आदिवासी सहकारी संस्थांकडे स्वत:चे गोदाम नसून केंद्राच्या ठिकाणीसुद्धा इतर सोय नाही. त्यामुळे १ जूनपासून रब्बी पिकाचे धान खरेदी करणे शक्य नाही.- शंकरलाल मडावी, अध्यक्ष, आदिवासी विविध कार्यकारी समिती संघ, गोंदिया जिल्हा 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी