वृक्षतोडीचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजातीवर

By Admin | Updated: October 25, 2014 22:43 IST2014-10-25T22:43:47+5:302014-10-25T22:43:47+5:30

निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ट केली जात आहे. वृक्षतोडीने मानवी जिवनावर जसा परिणाम होत आहे. तसाचा परिणाम पशुपक्ष्यावरील झाला आहे.

Trees affected by bird species | वृक्षतोडीचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजातीवर

वृक्षतोडीचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजातीवर

रावणवाडी : निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ट केली जात आहे. वृक्षतोडीने मानवी जिवनावर जसा परिणाम होत आहे. तसाचा परिणाम पशुपक्ष्यावरील झाला आहे. याच मुख्य कारणामुळे निसर्गात स्वतंत्र वावरण्याऱ्या पक्ष्याच्या प्रजाती लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि बऱ्याच प्रजाती लूप्त झाल्या आहेत.
मानवास अन्न निवारा वस्त्र सोबत प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुध्द वातावरणाची गरज आहे. शुध्द वातावरण निर्मिती वृक्षामुळेच होते शुध्द वातावरण करून देण्याऱ्या मुळ स्त्रोतावरच मानवाने घाला घातल्याने त्याचा परिणाम मानवासह पक्ष्यावरही आला आहे.
मानव आपल्या स्वार्थासाठी जंगले वृक्ष नष्ट केली जात असताना शासनाकडून कोणतीच ठोस उपाय योजना केली जता नाही. म्हणून यावेळी अल्पशा क्षेत्रात जंगल उरले आहे. त्यालाही वाचवण्याचे प्रयत्न शासनाकडून होत नाहीत नवीन झाडे लावण्याचा अभाव ज्या भागता झाडे लावलीत ती जगवण्याचा अभाव या कारणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला यातुनच ग्लोबल वॉर्मिगची समस्या निर्माण झाली आहे. तिचा फटका अरण्या जंगलाला जाणवत असून विविध समस्या आज पुढे आल्या आहेत.
शुध्द हवा मिळत नसल्याने निसर्गाच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या पक्ष्याची संख्या सुध्द दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर येत्या समोरील काळात पक्ष्याच्या जातीचे अस्तीत्व नाहीसे आल्या शिवाय राहणार नाही.
मानवी जिवनामध्ये वृक्षाचे अनन्य साधारण महत्व आहे. वृक्षामुळे मनुष्य जातीला औषध इंधन फळ फूले इमारती याकडे तसेच पर्यावरणाचे संवर्धन सुध्दा होत असते हे सर्व करण्याची जबाबदारी शासनाच्या वन विभागाकडे असते परंतु वन विभागाचा जाणीवपूर्वक दुर्लक्षधोरणामुळे वृक्षाची मोठ्या प्रमानात कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्ष हाच आधार असलेले पक्षी सहजच लुप्त होत आहेत.
मानव आपल्या गरजापूर्ण करण्यासाठी सर्रास वृक्षाची कत्तल करीत आहेत. पूर्वी लोक संख्या कमी होती त्यांचा गरजाही अल्पच होती. गावोगावात मोठमोठी झाडे होती. त्या झाडाची पूर्वीचे लोक वृक्ष पूजन करीत होते.
घराच्या समोर, बाजूस, शेतावर प्रत्येक वर्षी झाडांची लागवड करायचे आता त्यांची कत्तल केली जाते. वृक्षांपेक्षा जागोजागी सिमेंट काँक्रेटचे जंगल उभे होऊ लागले आहे. वृक्षांची होणारी कत्तलीमुळे जंगले ओसाड पडत आहेत. परिणामी पक्षयांवर याचा विपरीत परिणाम पडत आहे. (वार्ताहर)

Web Title: Trees affected by bird species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.