घनकचरा प्रकल्पाने होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:25+5:30
खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण दूषित होत आहे.

घनकचरा प्रकल्पाने होणार कायापालट
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी नगर परिषदेकडून जागेचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प उभा झाल्यास शहर व गावांतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या सुटणार आहे. शिवाय प्रकल्पामुळे खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे.
आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण दूषित होत आहे. याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावरही होत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.सध्या केंद्र शासनाकडून स्वच्छतेवर जास्त भर दिला जात आहे. वातावरण स्वच्छ असल्यास स्वस्थ आरोग्य लाभते यामुळे शहरीच काय ग्रामीण भागातही स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यासाठीच नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची गरज आहे.त्यासाठी त्यांचा जागेसाठी शोध सुरू आहे. नगर परिषदेचा हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा झाल्यास शहरातील घनकचºयाची समस्या सुटणार असतानाच संबंधीत गावांतीलही घनकचºयाचे व्यवस्थापन होणार आहे. याचा फायदा त्या-त्या गावांनाही मिळणार आहे. याशिवाय, या प्रकल्पात कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खत व गॅस निर्मिती केली जाणार आहे.
प्रकल्प असलेल्या गावकऱ्यांना प्रकल्पातून खत मिळणार. शिवाय, वाहन व घरांत स्वयंपाकासाठी गॅस मिळणार. महत्त्वाची बाब म्हणजे, या घनकचरा प्रकल्पात मनुष्यबळ लागणार असून रोजगार निर्मिती होणार आहे. काही लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.एकंदरीत हा प्रकल्प घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठीच फायदेशीर नसून त्यापासून अन्य फायदे मिळणार आहेत.
कारंजा ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा आज
नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जवळील ग्राम कारंजा येथील जागा बघितली आहे. ही जागा नगर परिषदेला द्यायची की नाही हे ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.४) विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे गावातील वातावरण गावातील नागरिकांच्या आरोग्यावर काहीच परिणाम होणार नाही. उलट गावातील कचºयाचेही व्यवस्थापन करता येणार असून गावातील वातावरण अधिक शुद्ध होणार आहे. त्यामुळे आता कारंजा ग्रामपंचायतने ठराव दिल्यास गोंदिया शहरासह कारंजा गावातील कचºयाची समस्या सुटून सोबतच त्यांना खत, गॅस व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अत्यंत लाभदायी ठरणारा प्रकल्प
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या सुटणार असतानाच गावकऱ्याना खत, गॅस व रोजगार उपलब्ध होणार आहे. गावातील कचऱ्याची समस्या सुटून तेथील वातावरण दूषित होणार नाही.त्यामुळे प्रकल्पासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
- अशोक इंगळे, नगराध्यक्ष, नगर परिषद, गोंदिया
गावचाही बहुमुखी विकास होणार
या प्रकल्पामुळे संबंधीत गावातील घनकचरा व्यवस्थापनाची समस्या सुटेल. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावाला चांगली कामगिरी करता येईल. शिवाय, गावातील लोकांना रोजगार मिळणार असतानाच खत व गॅसचाही लाभ घेता येईल. प्रकल्पामुळे गावातील वातावरण व लोकांच्या आरोग्यावर काहीच दुष्परिणाम होणार नाही.
- चंदन पाटील, मुख्याधिकार, नगर परिषद, गोंदिया