शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्याचा कृषी विभाग रिक्त पदांमुळे पांगळा

By admin | Updated: March 31, 2015 01:30 IST

शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त

सहसंचालकांचे दुर्लक्ष : ११ पदे रिक्त, दीड वर्षापासून दोन्ही मंडळ प्रभारावरतिरोडा : शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना नव्याने सुरु केल्या आहेत. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित आहे.तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत ७ पदे आधीपासूनच रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयांतर्गत दोन मंडळ कृषी कार्यालय मुंडीकोटा आणि तिरोडा आहेत. कृषी सहायकाचे एकूण पदे २४, सुपरवायजर (पर्यवेक्षक) ५ आणि कार्यालय कृषी सहायक १ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून तिरोडा तालुका कृषी विभागाकडे कृषी सहसंचालकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.दीड-दोन वर्षात मुंडीकोटा आणि तिरोडा मधील दोन्ही मंडळ कृषी अधिकारी, सेवानिवृत्त झालेले आहेत. तेव्हापासून दोन वर्ष लोटून सुद्धा मंडळ कृषी अधिकाऱ्यांची व्यवस्था तिरोउज्ञ येथे कृषी सहसंचालकानी केलेली नाही. आज ही दोन्ही मंडळ प्रभारावर चालत आहेत. तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त पडून आहे. गेल्या सहा महिन्यापासून अर्जुनी, परसवाडज्ञ सहित तीन कार्यक्षेत्र कृषी सहायक विणा प्रभारावर चालत आहेत. एका सहायकाकडे तीन ते ५ गावे असताना दुसऱ्या सहायकाचे पुन्हा ५ गावे प्रभारावर दिल्याने त्या सहायकाची कोणती अवस्था होत असेल आणि ते सहायक शेतकऱ्यांना किती सेवा देत असतील याचा मंथन खुद कृषी विभागाच्या आळा अफसरांनी करायला पाहिजे.पुर्वीचेच सात पदे रिक्त असताना २०१४ मध्ये सहा कृषी सहायकाचे स्थानांतरण करण्यात आले. नव्याने एकही कृषी सहायक पाठविले नसल्याने तिरोडा कृषी विभागाने त्या स्थानांतरीत कृषी सहायकांना सोडले नव्हते. मात्र नागपूर विभागाने सहसंचालकांना स्थानांतरीत कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने २८ फेब्रुवारीला सहा कृषी सहायकांना तिरोडा तालुका कृषी विभागातून कार्यमुक्त केले आहे. कार्यमुक्त केलेल्या सहायकामध्ये तीन महिला सहायकांचा समावेश आहे. तिरोडा तालुका कृषी विभागात कृषी सहायकांची ९ पदे रिक्त झाली आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांची दोन पदे अशी एकूण १२ पदे रिक्त असून तालुका कृषी विभाग एक प्रकारचा अपंग झाला आहे. (प्रतिनिधी)आधीच कमतरता, त्यात स्थानांतरजलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्याकरीता कृषी विभागात कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना स्थानांतरीत करुन विकासात्मक कामात एक प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाकडे जलशिवाराव्यतिरिक्त असणारे अन्य उपक्रम पूर्ण करण्याकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे. कृषी सहसंचालकांशी ज्या पद्धतीने स्थानांतरित करण्याचे आदेश निर्गमित केले, त्यानुसार त्या जागा भरण्याची काळजी तातडीने घेणे गरजेचे आहे. कामाचा व्याप अधिक असला तरी सहकार्याच्या भावनेने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आतापर्यंत स्थानांतरित कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्ययुक्त करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची जबाबदारी आपली नसून विभागाची आहे.- पी.व्ही. पोटदुखेतालुका कृषी अधिकारी, तिरोडा.