शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेविकांना टोलवाटोलवी

By admin | Updated: June 8, 2014 00:02 IST

कामावर असलेल्या संपूर्ण २८0 आरोग्य सेविकांच्या कामांचे मुल्यमापन करण्याचे खुले आव्हान देत ४४ आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू आहे. रखरखत्या उन्हात त्या आपल्या हक्कासाठी मैदानात उतरल्या असून

गोंदिया : कामावर असलेल्या संपूर्ण २८0 आरोग्य सेविकांच्या कामांचे मुल्यमापन करण्याचे खुले आव्हान देत ४४ आरोग्य सेविकांनी धरणे आंदोलन सुरू आहे. रखरखत्या उन्हात त्या आपल्या हक्कासाठी मैदानात उतरल्या असून २ जून पासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान त्यांनी अधिकार्‍यांची भेट घेऊन पुनर्नियुक्तीची मागणी केली. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी त्यांची टोलवा-टोलवी करीत असल्याचे या आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे. यामुळेच आता सोमवारपासून (दि.९) या ४४ आरोग्य सेविका साखळी उपोषण सुरू करणार आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविकांची २३६ पदे मंजूर आहेत. परंतु आरोग्य विभागात २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पीआयपी अंतर्गत मंजूर २३६ तर कंत्राटी ४४ आरोग्य सेविकांच्या संख्येवरून नेहमीच काही ना काही वाद निर्माण होतो. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव मेश्राम यांनी आपल्या कार्यकाळात अधिकच्या आरोग्य सेविकांना नियुक्ती दिल्याने हा वाद निर्माण  झाला आहे. यामुळे मात्र जुन्या आरोग्य सेविका अडचणीत आल्या आहेत. परिणामी जिल्हा परिषदेने ९६ आरोग्य सेविकांना सेवेतून कमी केले होते. यावर मात्र आरोग्य सेविकांच्या आंदोलना नंतर ४४ आरोग्य सेविकांना पुन्हा कामावर  घेण्यात आले. मात्र आता त्यांनाही मार्च नंतर पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नसल्याने त्या अधांतरीच आहेत.
पुनर्नियुक्ती द्यावी या मागणीसाठी या ४४ आरोग्य सेविकांचे २ जून पासून धरणे आंदोलन सुरू आहे. आपल्या आंदोलनांतर्गत त्यांनी २८0 आरोग्य सेविकांचे मुल्यमापन करण्याचे जिल्हा परिषदेला म्हटले.  तर त्यानंतरही एक आशा बाळगून त्या अधिकार्‍यांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अधिकारी या आरोग्य सेविकांना  यांच्याकडे-त्यांच्याकडे पाठवून त्यांची टोलवा-टोलवी करीत आहेत.
एवढेच नव्हे तर आंदोलनावर बसलेल्या या आरोग्य सेविकांना अपमानास्पद वागणुकीचा सामनासुद्धा करावा लागत असल्याचे या आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे.  कुणाचा अधिकार न हिरावता कामांचे मुल्यमापन करवून घेण्याची तयारी या ४४ आरोग्य सेविकांनी दर्शविली आहे. मात्र अधिकारी त्यांचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशात आता लढा सुरू झाला असून मधात सोडता येत नसल्याने  आपल्या न्यायासाठी सोमवारपासून (दि.९) साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे आरोग्य सेविकांनी सांगीतले.  (शहर प्रतिनिधी)