शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आजपासून महासंपर्क अभियान

By admin | Updated: May 1, 2015 00:05 IST

भारतीय जनता पक्षाने १ नोव्हेंबरपासून सुरु केलेले महासदस्यता अभियान ३० एप्रिलला पूर्ण झाले.

गोंदिया : भारतीय जनता पक्षाने १ नोव्हेंबरपासून सुरु केलेले महासदस्यता अभियान ३० एप्रिलला पूर्ण झाले. जिल्ह्यात सदस्यता नोंदणीची लक्ष्यपूर्ती झाली असून या अभियानाचे पुढचे पाऊल म्हणून नोंदणी झालेल्या सदस्यांसोबत प्रत्यक्ष संपर्क व संवाद करण्यासाठी १ मे पासून महासंपर्क अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित या पत्रपरिषदेला आ. विजय रहांगडाले, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अग्रवाल यांनी सांगितले, भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात सदस्यता अभियानाची सुरुवात २५ डिसेंबर २०१४ ला केली. जिल्ह्याला सदस्य नोंदणीचे सव्वा लाखाचे मिळालेले उद्दिष्ट पुर्ण झाले असून दीड लाख सदस्य नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. महासंपर्क अभियानांतर्गत भाजपाचे सदस्य बनलेल्या नागरिकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांची पक्षाविषयीची मनोभावना समजून घेणे हा या महासंपर्क अभियानाचा उद्देश राहणार आहे. सदस्यता अभियानात मतदारांना मनदाता बनविण्याचा प्रयत्न तर मनदात्यांना कार्यकर्ता बनविण्याची प्रक्रिया आहे. माजी आ.भेरसिंग नागपुरे हे या अभियानाचे जिल्ह्याचे प्रमुख राहणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपा मोठे यश प्राप्त करेल, असा विश्वासही यावेळी विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)