शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या उत्साहावर अवकाळीचे विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस वादळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कायम होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस दिवाळीच्या उत्साहावर विरजन घालणार का असे बोलले जात होते.मागील आठड्यात सुध्दा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा फटका खरीपातील धानपिकांना बसला होता.

ठळक मुद्देधान पिकांना बसला फटका । बांध्यांमध्ये साचले पाणी, जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी सणाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत होती. तर दिवाळीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शनिवारी(दि.२६) सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चार वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या अनेक नागरिकांचा हिरमोढ होऊन त्यांच्या उत्साहावर पावासाचे विरजन पडले.हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस वादळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कायम होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस दिवाळीच्या उत्साहावर विरजन घालणार का असे बोलले जात होते.मागील आठड्यात सुध्दा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा फटका खरीपातील धानपिकांना बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. मात्र दुपारी ४ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे अनेकांना खरेदी न करताच घरी परत जावे लागले. त्यामुळे त्यांचा सुध्दा हिरमोढ झाला होता.सर्वच भागात पाऊसजिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी,आमगाव, सालेकसासह इतर भागात सुध्दा शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात एक ते दीड तास पाऊस झाल्याने याचा या भागातील धानपिकांना सर्वाधिक फटका बसला.शेतकऱ्यांचे नुकसानसध्या खरीप हंगामातील धानाची कापणी सुरु आहे. मात्र शनिवारी झालेल्या पावसाचा फटका कापणी करुन बांध्यामध्ये ठेवलेल्या धान भिजला. बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता आहे.तर शेतामध्ये उभा असलेला धान सुध्दा पाऊस आणि वाऱ्यामुळे झोपला. यामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलायावर्षी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाल्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा बंफर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती