शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

नाल्यात वाहून गेले तीन तरुण, आंघोळीसाठी उतरले होते, देवरी पोलीस घटनास्थळी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 2:58 PM

सावन सिताराम पटले (२२), अतुल माणिकचंद ठाकूर (१६) व  संदीप सोमराज कटरे (२२) रा.धोबीसराड असे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत.

गोंदिया :  देवरी तालुक्यातील धोबीसराड नाल्यात आंघोळीसाठी गेलेले तीन तरुण वाहून गेल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या तीन तरुणाचा शोध आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने घेतला जात आहे. सावन सिताराम पटले (२२), अतुल माणिकचंद ठाकूर (१६) व  संदीप सोमराज कटरे (२२) रा.धोबीसराड असे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी सकाळी धोबीसराड येथील पाच मुले गुरांसाठी चारा आणायला जंगल परिसरात गेले होते. मंगळवारी झालेल्या पावासामुळे नदी, नाले, ओढे हे भरून वाहत आहेत. चारा आणताना नाला गावाजवळूनच वाहत  असल्याचे पाहून त्या तरूणांना आंघोळीचा मोह आवरता आला नाही. पाचही तरूण आंघोळीसाठी नाल्यात उतरले असता  आंघोळ करीत असताना अचानक पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.

या घटनेची माहिती दोन तरुणांनी गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावक-यांनी नाल्याकडे धाव घेतली. तसेच याची माहिती देवरी पोलिसांना दिली. देवरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. वाहून गेलेल्या तरुणांचा शोध अजून लागला नव्हता.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ