शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करणाऱ्यांचा तीनचा पाढा आहे सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात रविवारी (दि. २५) ६१६ बाधितांनी कोरोनावर मात केली; तर ६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ६१६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ८७, गोरेगाव ४२, आमगाव ५४, सालेकसा ८, देवरी १४, सडक अर्जुनी २४, अर्जुनी मोरगाव ८९ आणि बाहेरील राज्यातील सात रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे६१६ बाधितांची मात : ६४५ नवीन रुग्णांची नोंद, १३ बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आठ दिवसांच्या कालावधीत ५१९८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ७६.४० वर पोहोचला आहे. एकंदरीत, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. २५) ६१६ बाधितांनी कोरोनावर मात केली; तर ६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ६१६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ८७, गोरेगाव ४२, आमगाव ५४, सालेकसा ८, देवरी १४, सडक अर्जुनी २४, अर्जुनी मोरगाव ८९ आणि बाहेरील राज्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचणी शिबिर घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १३०४३५ जणांचे स्रावनमुने तपासण्यात आले. त्यांपैकी १०५८१८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १२८८८५ नमुने तपासणी करण्यात आले. त्यांपैकी १११५७६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०२७८ कोरोनाबाधित आढळले आहे. यांपैकी २३२५८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६५५३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत; तर ५८३८ स्रावनमुन्याचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.  

आतापर्यंत ४६७ बाधितांचा मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत ४६७ कोरोना बाधितांचा मृत्त्यू झाला आहे. यात मागील आठ दिवसांच्या कालावधीत १२२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हे एप्रिल महिन्यात झाले असून, मागील वर्षी सप्टेंबर महिन्याचे रेकार्ड मोडले आहे. एक लाख ४५ हजार नागरिकांचे लसीकरण जिल्ह्यात काेविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत एकूण एक लाख ४५५२३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत कोवॅक्सिन लसीचे ११०० डोस शिल्लक असून कोविशिल्ड लसीचा साठा संपला असून, येत्या दोन-तीन दिवसांत तो येणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या