शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या ररस्त्याचे तीन-तेरा

By admin | Updated: June 6, 2014 00:04 IST

येथील सिव्हील लाईंनवासीयांना रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार्‍या रस्त्याचे तीन-तेरा वाजले आहे. सिव्हील लाईंस परिसरातील नागरिकांचे या रस्त्यानेच रेल्वे स्थानकाकडे जाणे-येणे सुरू असते.

गोंदिया : येथील सिव्हील लाईंनवासीयांना रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार्‍या रस्त्याचे तीन-तेरा वाजले आहे. सिव्हील लाईंस परिसरातील नागरिकांचे या रस्त्यानेच रेल्वे स्थानकाकडे जाणे-येणे सुरू असते. मात्र आजघडीला हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने येथून ये-जा करणे आज कठीण झाले आहे. करिता या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी सिव्हील लाईंनवासी क रीत आहेत.
सिव्हील लाईंन परिसरात शहराच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या विवेकानंद कॉलोनी पासून ते अन्य भागातूून सुद्धा बहुतांश नागरिकांना रेल्वे स्थानकाकडे जावयाचे असल्यास त्यांना रेल्वे क्वार्टर परिसरातून टेलीफोन एक्सचेंज समोरचा रस्ता उपयुक्त ठरतो. याच मार्गावर टेलीफोन एक्सचेंज व पोस्ट ऑफीस, बाई गंगाबाई रूग्णालय असल्याने व पुढे जाऊन बाजार तसेच रेल्वे स्थानक येत असल्याने या मार्गावर दिवसरात्र वर्दळ असते. रेल्वे स्थानकावरून सिव्हील लाईंस मध्ये जायचे म्हटल्यास रिक्षा व ऑटोवाले थेट याच मार्गाने होत प्रवाशांना घेऊन जातात. यामुळे सिव्हील लाईंसवासीयांसाठी हा रस्ता महत्वाचा आहे. आजघडीला मात्र या रस्त्याची पार दुर्गत झाली आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला आहे. यामुळे रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून यातून मार्ग काढत ये-जा करणे त्रास दायक झाले आहे. आज या रस्त्याने आवागमन केले असता दचके बसत असून चिमुकले वृद्धांना येथून घेऊन जाणे धोकादायक झाले आहे. असे असतानाही स्थानिक जनप्रतिनिधी किंवा नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. सध्या शहरात रस्ता दुरूस्तीची कामे वेगाने होत आहेत. हि चांगली बाब आहे, मात्र यासोबतच महत्वाच्या रस्त्यांची दुरूस्ती होणे अतिशय गरजेचे आहे. करीता सिव्हील लाईंसवासीयांसाठी महत्वपूर्ण असलेल्या या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी सिव्हील लाईंस मधील नागरिक करीत आहेत.  (शहर प्रतिनिधी)