शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

२४ तासात बदलले तीन उपविभागीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM

गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर राम लंके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. परंतु आता शासनाकडून उपविभागीय अधिकारी म्हणून नागपूरचे उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) यांची नियुक्ती करण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातून नागपूर विभागाचे उपायुक्त (राजस्व) सुधाकर तेलंग यांनी आदेश काढला.

ठळक मुद्देगोंदियाच्या इतिहासातील पहिलीच घटना : सोयीसाठी तर बदली नाही ?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून राजकीय आणि प्रशासकीय घडामोंडीना वेग आला आहे. असाच काहीसा प्रकार गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाबतीत घडला. अवघ्या २४ तासात तीन उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्यात आल्याने या सर्व प्रकारामुळे हा सोयीचा अधिकारी आणण्याचा तर प्रयत्न नाही अशी जोरदार चर्चा आहे.गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर राम लंके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. परंतु आता शासनाकडून उपविभागीय अधिकारी म्हणून नागपूरचे उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) यांची नियुक्ती करण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातून नागपूर विभागाचे उपायुक्त (राजस्व) सुधाकर तेलंग यांनी आदेश काढला.सद्यस्थितीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. विधानसभा निवडणूक सुव्यवस्थीत पार पडावी हे प्रशासनासमोर एक आव्हान आहे. परंतु उपविभागीय अधिकारी राम लंके यांनी शासनाकडून अनिवार्य केलेले निवडणूक प्रशिक्षण घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर शिरीष पांडे यांना पाठविण्यात येत असल्याची माहिती होती. परंतु पुन्हा आता शिरीष पांडे यांच्या जागी २३ सप्टेंबर रोजी भंडाराच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी वंदना सवरंगपते यांची नियुक्ती करण्यात आली. २२ सप्टेंबरपर्यंत राम लंके होते. त्यात विभागीय आयुक्त कार्यालयाने जावक क्र. ११५५ हे पत्र काढून शिरीष पांडे यांची नियुक्ती केली. दुसºयाच दिवशी पत्र काढून वंदना सवरंगपते यांची नियुक्ती केली. २४ तासात गोंदिया उपविभागीय कार्यालयात तीन उपविभागीय अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती झाल्याने आचारसंहितेच्या काळात दबावापोटी तर नियुक्तीत बदल केला नाही नाह अशी चर्चा आहे.शासकीय कर्मचाºयांच्या बदल्या संदर्भात विनियमन व शासकीय कार्य पूर्ण करतांना उशीर झाल्यास अधिनियम २००५ चे कलम ४ (४) व ४ (५) नुसार सदर नियुक्ती फक्त निवडणुकीपर्यंतच मर्यादीत राहील.निवडणूक झाल्यानंतर राम लंके पुन्हा गोंदियाचे उपविभागीय अधिकारी राहतील व वंदना सवरंगपते यांना पुन्हा जुन्याच ठिकाणी पदभार सांभाळावा लागणार असल्याचे बोलल्या जाते.

टॅग्स :Transferबदली