शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

जिल्ह्यात सुरू असलेले डेंग्यूचे थैमान अद्यापही कायमच आहे. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्या योजना कुचकामी ठरत आहेत.

पालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्याची नागरिकांची मागणी आर्वी : जिल्ह्यात सुरू असलेले डेंग्यूचे थैमान अद्यापही कायमच आहे. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्या योजना कुचकामी ठरत आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आर्वी तालुक्यात पुन्हा नव्याने तीन रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात व्हायरल फिव्हरसह डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्णाची तपासणी केली असता एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे आर्वीत दोन तर धनोडी येथे एक असे एकूण तीन रुग्ण तालुक्यात आहेत. जिल्ह्यातच नव्हे राज्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत आहे. आर्वीतील साईनगर येथील एक, गणपती वॉर्डातील एक तर तालुक्यातील धनोडी येथे एका रुग्णाला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रुग्णालयात तपासणी करीता येत असलेल्यापैकी दोन ते तीन रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर येत असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी दिली. आर्वीतील न.प. अंतर्गत येणाऱ्या वॉर्डात या रोगाच्या पार्श्वभूमीवर नियमित साफ सफाई व रोगाबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. पालिकेने नाल्यांची, सांडपाण्याची स्वच्छता करावी, औषध फवारणी करण्याची मागणी येथील नागरिकांनी पालिकेडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)