धान खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी तीन भरारी पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:22+5:30

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. मात्र यंदा धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. यामुळे या दोन्ही विभागाचे नियोजन फसल्याचे चित्र आहे. तर काही केंद्रावर खरेदी करण्यासाठी लागू केलेल्या निर्देशांचे सुध्दा उल्लघंन केले जात होते.

Three large squadrons came in to check the paddy shopping center | धान खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी तीन भरारी पथक दाखल

धान खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी तीन भरारी पथक दाखल

ठळक मुद्देराईस मिलची करणार पाहणी : खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावानुसार धान खरेदी करण्यात येत आहे.मात्र अनेक केंद्रावर नियमांचे उल्लघंन आणि भरडाईच्या प्रक्रियेत घोळ होत असल्याची ओरड वाढली होती. लोकमतने सुध्दा हा मुद्दा लावून धरला होता. याची दखल घेत शासनाने मुंबई आणि पुणे येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या अधिकाऱ्यांचे तीन भरारी पथक तयार करुन ते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पाठविले आहे. या पथकाने बुधवारपासून केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे फेडरेशनचे अधिकारी आणि राईस मिलर्समध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. मात्र यंदा धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. यामुळे या दोन्ही विभागाचे नियोजन फसल्याचे चित्र आहे. तर काही केंद्रावर खरेदी करण्यासाठी लागू केलेल्या निर्देशांचे सुध्दा उल्लघंन केले जात होते. तर काही केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी केली जात होती. तर खरेदी केंद्रावर आवश्यक सोयी सुविधांचा अभाव होता.
लोकमतने सुध्दा हा विषय लावून धरला होता. याची दखल घेत शासनाने या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुंबई आणि पुणे येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले तीन भरारी पथक तयार करुन ते गोंदिया आणि भंडारा येथे पाठविले आहे.या भरारी पथकाने बुधवारी (दि.५) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून खरेदी केंद्राची यादी घेऊन केंद्राना प्रत्यक्ष भेट देऊन चौकशीला सुरूवात केली आहे.
या पथकाला १३ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण केंद्राना भेटी देऊन त्याचा अहवाल गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे.
शासनाने चौकशीसाठी ठरवून दिलेल्या गोष्टींचे बारीक निरीक्षण करायचे आहे. तसेच केंद्रावरील धानाची भरडाई करण्यासाठी करार केलेल्या राईस मिलला भेट देऊन नियमानुसार भरडाई करुन सीएमआर तांदूळ जमा केला जात आहे किंवा नाही याची चाचपणी करायची आहे. यामुळे सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि राईस मिलर्समध्ये खळबळ उडाली आहे.

पथक करणार या गोष्टींची चाचपणी
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकऱ्यांचे सातबारा,पीक पेरा प्रमाणपत्र,ऑनलाईन नोंदणी, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाचे चुकारे ऑनलाईन करण्यात येत आहे किंवा नाही, खरेदी केंद्रावर शासनाच्या निर्देशानुसार सोयी सुविधा पुरविल्या जात आहे किंवा नाही. ज्या गावाचा ज्या केंद्रामध्ये समावेश आहे त्याच केंद्रावर धानाची विक्री केली जात आहे किंवा नाही. राईस मिलर्सना भरडाईसाठी दिलेल्या सीएमआर तांदूळ दिलेल्या मुदतीत जमा करण्यात आला किंवा नाही याची चौकशी हे पथक करणार आहे.

जमा केलेल्या तांदळाची गुणवत्ता तपासणार
प्रशासनाने करार केलेल्या राईस मिलर्सनी खरेदी केंद्रावरुन ज्या धानाची उचल केली. त्याच धानाची भरडाई करुन तोच तांदूळ जमा करण्यात आला किंवा नाही. बाहेरील राज्यातील धान आणून त्याची भरडाई करुन तांदूळ तर जमा करण्यात आला नाही ना याची देखील भरारी पथकातील अधिकारी पाहणी करणार आहे.त्यामुळे भरारी पथक नेमका काय अहवाल सादर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Three large squadrons came in to check the paddy shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.