जिल्ह्यातील ३५९ जण निगराणीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:22+5:30
बाहेरील देशातून कामानिमित्त देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुध्दा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे.

जिल्ह्यातील ३५९ जण निगराणीखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर कोरोनामुळे विदेशात वास्तव्यास असणारे अनेकजण स्वगृही परत आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२०) विदेशातून एकूण ७३ जण परतले आहेत. यासर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या संर्पकात आलेल्या २८६ अशा ३५९ जणांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगरानीखाली आहेत.
बाहेरील देशातून कामानिमित्त देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुध्दा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांची नोंदणी केली जात आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. विदेशात असलेले ७३ जण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतले आहेत. आतापर्यंत कोरोनासारखी तिघांना लक्षणे वाटत होती.त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. परंतु त्या तिघांचे नमुने निगेटिव्ह आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकही संशयीत किंवा रूग्ण नाही.