शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जंगलातील वणवा विझवितांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 8:42 AM

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील जंगलात लागलेली आग विझवितांना विझवितांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यु झाला तर 2 जण  गंभीर जखमी झाले.

गोंदिया -  नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रात अज्ञात इसमांनी गुरुवारी अज्ञात इसमानी आग लावली. या आगीने उग्र रुप धारण केले होते. ही आग विझविताना तीन हंगामी वन मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री (दि.८) उशीरा उघडकीस आली. राकेश युवराज मडावी (४०) रा. थाडेझरी, रेखचंद गोपीचंद राणे (४५) रा. धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे (२७) रा. कोसमतोंडी असे मृतक मजुरांची नावे आहे. तर विजय तिजाब मरस्कोल्हे (४०) रा. थाडेझरी व राजू श्यामराव सयाम (३०) रा. बोळूंदा जि. गोंदिया असे गंभीर जखमी असलेल्या मजुरांची नावे आहे. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९८,९९, १००, ९७ मध्ये गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग विझविण्याचे काम ५० ते ६० वन कर्मचारी व हंगामी मजूर करीत होते. सायंकाळी ६ वाजतापर्यंत आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र याच दरम्यान पुन्हा हवाधुंद सुरु झाल्याने वनवा वाढला. वनवा विझवित असताना अचानक आगीने चारही बाजुने वनमजुरांना वेढा घातला व हा परिसर पहाडीवर असल्याने वनमजुरांना कुठलीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे मध्यभागी पाच ते सहा मजूर अडकले. यात तीन मजुरांचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर झाले. हे सर्व वनमजूर हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. हा सर्व घटनाक्रम गुरुवारी रात्रीपर्यंत सुरु होता असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे वन मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याची माहिती उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलन करण्यासाठी काही नागरिक जंगलात आग लावतात. याच आगीचे रुपातंर वनव्यात होेते. दरम्यान गुरुवारी नागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात यामुळेच आग लागल्याचे बोलल्या जाते. तर जंगलातील वनवा विझवित असताना फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रुप धारण केल्याने यामुळेच तीन हंगामी वनमजुरांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही.  घटनेची माहिती देणे टाळलेनागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वनवा लागला. त्यानंतर वनवा विझविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. पण यात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची बाब वन व वन्यजीव विभागाने पुढे येऊ दिली नाही. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) सकाळच्या सुमारास याची माहिती दिली.  गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण वनवा विझविताना तीन हंगामी वन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर झाले. हे सर्व मजूर सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, थाडेझरी आणि बोळूंदा येथील आहेत. या घटनेचे वृत्त गावकऱ्यांमध्ये पसरताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला.

टॅग्स :forestजंगलfireआग