शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

५७ हजार वीज ग्राहकांकडे १0 कोटींचे बिल थकीत

By admin | Updated: June 8, 2014 00:02 IST

एकीकडे भारनियमनाला घेऊन वीज ग्राहकांत ओरड सुरू आहे. दुसरीकडे वीज बिल भरण्यात दिरंगाईचे धोरण अवलंबल्या जात आहे. कृषी पंपधारकांसह घरगुती वीज ग्राहक आणि शासकीय कार्यालयांकडेदेखील

गोंदिया : एकीकडे भारनियमनाला घेऊन वीज ग्राहकांत ओरड सुरू आहे. दुसरीकडे वीज बिल भरण्यात दिरंगाईचे धोरण अवलंबल्या जात आहे. कृषी पंपधारकांसह घरगुती वीज ग्राहक आणि शासकीय कार्यालयांकडेदेखील थकबाकी शिल्लक आहे. जिल्ह्यात ५७ हजार वीज ग्राहकांवर महावितरणच्या ९ कोटी ७६ लाख ४४२ रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महावितरणच्या नियमाप्रमाणे फीडर तयार करून ज्या फीडरवर वीजबिल भरणा कमी किंवा तूट जास्त आहे. अशा फीडरवर भारनियमन केले जाते. जिल्ह्यात कृषी पंपधारक २१ हजार ९८७ ग्राहक आहेत. एप्रिल २0१२ ते मार्च २0१४ पर्यंंत त्यांना १३ कोटी ६१ लाख रुपयांचे वीज बिल देण्यात आले. यापैकी १२ हजार ९५७ ग्राहकांनी ७ कोटी ४0 लाख रुपये वीज बिल भरणा केला, तर ९ हजार ३ ग्राहकांनी अद्याप ४ कोटी २६ लाख रुपये भरणाच केला नाही. सर्वाधिक थकबाकीचे ग्राहकात कृषिपंपधारकांचा अव्वल क्रमांक लागत असला तरी घरगुती व दारिद्रयरेषेखालील २ लाख १ हजार ३२ ग्राहकांना ५ कोटी ६४ लाख ७0 हजार रुपयांची वीज बिल देण्यात आले. यातील १ लाख ५८ हजार २३९ ग्राहकांना ४ कोटी १८ लाख पाच हजार रुपयांचा भरणा केली. ४३ हजार ३९३ वीज ग्राहकांवर अद्याप एक कोटी ७२ लाख ५0 हजार रुपयाची थकबाकी आहे.
यासह व्यावसायिक ग्राहकांची संख्या जिल्ह्यात १0 हजारांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यावर १ कोटी ७३ लाख ३३ हजार रुपयाच वीज बिल आकारण्यात आले. त्यापैकी ७ हजार ५४३ ग्राहकांनी आतापर्यंत १ कोटी १६ लाख ५८ हजार रुपयाचा वीज बिल भरणा केला आहे. ३ हजार १२४ ग्राहकांवर ३१ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यात औद्योगिक ग्राहक दोन हजाराच्या वर आहेत. त्यांना २ कोटी ६६ लाख ४१ हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आले. त्यापैकी १ कोटी ९५ लाख १0 हजार रुपयांचे वीज बिल भरणा झाला असून ७0 लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी या ग्राहकांवर आहे. शहर व ग्रामीण भागातील ४५0 पाणीपुरवठा ग्राहकांना महावितरणाकडून २२ लाख १२ हजार रुपयांचे बिल देण्यात आले. त्यापैकी ७ लाख ५९ हजार रुपयांचा भरणा तर १५ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. पोल्ट्रीफार्मच्या ५४ ग्राहकांना १ लाख ९0५ रुपयांचा वीज पुरविण्यात आली. पैकी ५७ हजार ९३0 रुपयांचे वीज बिल आतापर्यंंत ग्राहकांनी भरलेला आहे.
असे एकूण २ लाख ३७ हजार ग्राहकांनी २३ कोटी ८८ लाख ७४ हजार ९0५ रुपयांचे वीज बिल देण्यात आले. पैकी एक लाख ८0 हजार ग्राहकांनी १४ कोटी ७७ लाख ८९ हजार रुपयाच विद्युत बिल भरलेला असून ५६ हजार ग्राहकांवर ७ कोटी १६ लाख ५९ हजार रुपयाचे विजेच्या बिलाचे थकबाकी आहे. शहरी व ग्रामीण भागातील पथदिव्यांचे पावणेसातशे ग्राहकांवर २ कोटी ५९ लाख ५५ हजार, तर शासकीय कार्यालयांवर ५५ हजार रुपयांची थकबाकी आहे. (तालुका प्रतिनिधी)