शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी नाही, हे शिवशाहीचे सरकार आहे

By admin | Updated: January 29, 2015 23:09 IST

आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात पापं केलीत. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, महागाई वाढली. शिवसेना ही वंचितावरील शोषण ऐकून घेते. समाजातील सुखदु:ख जाणून घेते.

एकनाथ शिंदे : शिवसेनेच्या मेळाव्यात प्रतिपादन अर्जुनी मोरगाव : आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात पापं केलीत. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, महागाई वाढली. शिवसेना ही वंचितावरील शोषण ऐकून घेते. समाजातील सुखदु:ख जाणून घेते. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीशी राहून मदतीचा हात देते ही शिवसेनेची शिकवण आहे. सत्तेत असलो तरी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू असे हे आघाडी नव्हे, तर शिवशाहीचे सरकार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि.२९) स्थानिक पंचायत समितीच्या पटांगणावर केले.शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित जिल्हा शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून नाशिकचे खा.हेमंत गोडसे उपस्थित होते. यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, शैलेष जायस्वाल, संजय पवार, जि.प.सदस्यकिरण कांबळे, राजेश चांदेवार देवरी, सोहन क्षिरसागर सालेकसा, सुरेंद्र नायडू आमगाव, राजेंद्र चामट तिरोडा,सुनील लांज़ेवार गोंदिया, सुनील मिश्रा देवरी, सुनील पालांदूरकर, सदाशीव विठ्ठले, सडक अर्जुनी, कुलतारसिंह भाटीया, राजू बोम्बाडे गोरेगाव, अर्जुनसिंह बैस सालेकसा व वंदना डोये उपस्थित होते. यावेळी ना. एकनाथ शिंदे व खा. हेमंत गोडसे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.ते पुढे म्हणाले, सत्तेत आल्यानंतर योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत काय? त्याची निट अंमलबजावणी होते किंवा नाही, लोकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिव संपर्क अभियानांतर्गत पाठविले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळाचे चित्र वेगळे नाही. आघाडी सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे. हे थांबविण्याच्या दृष्टीने विदर्भ व मराठवाड्यात काम सुरू झाले आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे व शेतकरी आत्महत्येवर प्रतिबंध घालणे यासाठी उद्धव ठाकरे सत्तेत सामिल होण्याचा निर्णय घेतला. विदर्भात ८५ टक्के बेरोजगार युवक आहेत. एमआयडीसी व उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी बोलणी करू. धानाला भाववाढ, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, रिक्त पदांचा अनुशेष, पर्यटनाला चालना, ब्रिटीशकालीन आणेवारी पद्धतीत सुधारणा यावर चर्चा घडवून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्ता जपला पाहिजे, सुखदु:ख समजून घेतली पाहिजे तेव्हाच तो जीवाची बाजी लावून पक्ष वाढवितो. गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हे धोरण अवलंबावे. आगामी काळात जि.प. व पं.स.च्या निवडणुका आहेत. या जिल्ह्यातून अपेक्षित काम झाले पाहिजे. प्रत्येक निवडणूक ही जिंकायचीच आहे. या निर्धाराने कामाला लागून शिवसेना मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. प्रास्ताविक शैलेष जायस्वाल यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी यादव कुंभरे, आनंद जायस्वाल, अजय पालीवाल, बबन बडवाईक, विजय खुणे, सुरेश ठवरे, सुधीर साधवानी, क्रिष्णा आगाशे, लैलेंद्र शिवणकर, मोरेश्वर सौं’रकर, अश्विन गौतम, प्रकाश उईके, कोमल सयाम, संजय लांबकाने, ज्ञानदेव कापगते, चेतन दहीकर आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)