शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात पिण्याचे पाणीच नाही

By admin | Updated: April 30, 2016 01:50 IST

स्थानिक तहसील कार्यालयातील जलशुद्ध थंड पाण्याची मशीन मागील ३-४ दिवसापूर्वीपासून बंद असल्याचे सांगितले जाते.

दुरुस्तीची मागणी : मशीन मागील ३-४ दिवसांपासून पडली बंद तिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयातील जलशुद्ध थंड पाण्याची मशीन मागील ३-४ दिवसापूर्वीपासून बंद असल्याचे सांगितले जाते. कार्यालयात कर्मचारी, अधिकारी असो वा सामान्य नागरिक असो, कुणालाही पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. मशीन बंद पडल्याने तहसीलदार यांनी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. सद्या वातावरणात उष्णता खूप आहे. उष्णतेची लाटच सुरू असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी मिळू नये, ही शोकांतिकाच आहे. दुसरीकडे शौचालय व मूत्रिघराच्या मागील कित्येक दिवसांपासून स्वच्छताच करण्यात आलेली नाही. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दिवाळीच्या वेळेस तुमच्या लोकमत पेपरला याबाबत बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर स्वच्छता केली होती. तेव्हापासून आतापर्यंत स्वच्छताच केली नसल्याचे सांगितले.कार्यालयातील पुरुष मंडळी शौचाकरिता बाहेर जातात. परंतु महिला कर्मचाऱ्यांचे काय? कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना काहीच सुविधा प्राप्त होत नाहीत. शौचालय व मुत्रीघरात घाणीचे साम्राज्य असून पाण्याची व्यवस्था नाही.याशिवाय तहसील कार्यालयात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. पार्किंगचा प्रश्नही सुटला नाही. कार्यालय परिसरात अस्तव्यस्थ दुचाकी पार्क केल्या जातात. नागरिकांना एकाच कामासाठी अनेकदा तहसील कार्यालयाच्या चकरता माराव्या लागतात. तरीपण तहसील कार्यालयातील थंड पाण्याची मशीन तत्काळ दुरुस्त करावी, मशिन दुरुस्त होईपर्यंत पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था तात्काळ करावी, शौचालय व मुत्रीघराची साफसफाई नियमित करण्यात यावी, या गंभीर बाबींकडे गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देवून सदर सामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी तिरोडा तालुक्यातील जनतेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)