शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसाच्या नळांमध्ये पाणी नाही…हरघर नळ योजना अजून पोहोचलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:13 IST

१० वर्षे लोटूनही पिण्याच्या पाण्याची समस्या : ६७ कोटींच्या योजनेला मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा नगरपंचायतला १० वर्षे लोटली तरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट असून आजही अनेक ठिकाणी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. नगरपंचायत क्षेत्रात आतापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल नळ योजना बेपत्ता असून प्रत्येक घरी नळ आणि त्या नळाला शुद्ध पाणी केव्हा मिळेल हे अजिबात सांगता येत नाही.

सन २०१५ मध्ये सालेकसा नगरपंचायतची घोषणा झाल्यानंतर २०१७ ते २०२२ या कालावधीत लोकशाही पद्धतीने नगरपंचायतवर सत्ता स्थापित झाली होती. तेव्हा नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक नगरपंचायतवर निवडून गेले. त्यापैकी चार नगरसेवकांना सभापतीपद मिळाले यामध्ये शिक्षण व आरोग्य, अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता सभापतींची निवड झाली. अशात नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींनी नगरपंचायत क्षेत्रात शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जे काही प्रयत्न केले असतील त्यात ते अपुरे पडले आणि नगरपंचायत क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही. 

आजही काही भागात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असून, पाणीपुरवठा योजनेंतर्गत महिला व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गरीब गरजू कुटुंबांना नगरपंचायतद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते. तर दुसरीकडे नगरपंचायतची पाणी पुरवठा व्यवस्था तोकडी ठरत आहे.

नगरपंचायत प्रशासनामार्फत मागील नगरपंचायत रचनेप्रमाणे सालेकसा क्षेत्रात एकूण १७ ठिकाणी सौर उर्जेची जोडणी करून बोअरवेलच्या माध्यमातून गावातील प्रमुख ठिकाणी नळ योजना लावण्यात आली आहे. परंतु यापैकी अनेक ठिकाणी नळ योजना बंद पडली असून जिथे सुरू आहे तिथे लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. कारण, एकाच ठिकाणी नळ असल्यामुळे संपूर्ण मोहल्ल्यातील लोक त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येतात. अशात पाण्याची समस्या अजून दूर झालेली नाही. सालेकसा परिसरात बाकलसर्रा, जांभळी, सालेकसा, हलबीटोला या ठिकाणी पाण्याची समस्या कायम आहे.

दोन बोअरवेलच्या माध्यमातून सहा हजार लोकांना पाणी पुरवठानगरपंचायत अंतर्गत खामगाव खुर्द परिसरात लोकांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी दोन बोअरवेलच्या भरोवशावर अवलंबून रहावे लागत आहे. यामध्ये पंचायत समिती परिसरात असलेल्या एक बोअरवेल द्वारे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरून गावाला पुरवठा केला जातो. तर रेस्ट हाऊस परिसरात असलेली दुसरी बोअरवेल रेल्वे स्थानक परिसरातील वस्तीमध्ये पाणीपुरवठा करीत आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याची टाकी भरण्यासाठी पाच ते सहा तास एवढा वेळ लागत असतो. पाच ते सहा हजार लोकांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही.

शहराला ६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षाशहरासह नगरपंचायत परिसरातील जवळपास आठ गावांना नियमितरित्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत ६७ कोटींची पाणी पुरवठा योजना मंत्रालयातून मंजूर करून घेण्यासाठी प्रतीक्षा केली जात आहे. शहरातील लोकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल याची उत्सुकता येथील नागरिकांना लागली आहे. ही योजना तयार झाल्यावर लोकांना नियमित मुबलक पाणी उपलब्ध होईल. परंतु मंजुरी केव्हा मिळेल आणि काम केव्हा होणार हे सांगता येत नाही.

"नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर करवून घेण्यासाठी स्थानिक आमदार तसेच संबंधित मंत्रालयात सतत पाठपुरावा केला जात आहे. योजना तयार झाल्यावर पाण्याची समस्या कायमची दूर होईल."- शालिनी बडोले, सामाजिक कार्यकर्ता, सालेकसा

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात