बाजारात होतेय ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:13+5:30

गोंदियाच्या बाजारपेठेची दूरवर ख्याती आहे. म्हणूनच जिल्हाच काय लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदीसाठी येते. त्यात आता दिवाळी फक्त दोनच दिवसांवर आली आहे. अशात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात जाम गर्दी वाढली आहे. हीच बाब हेरून व्यापारीही सकाळी लवकरच दुकान उघडत असून रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ खुली आहे.

There are traffic jams in the market | बाजारात होतेय ट्राफिक जाम

बाजारात होतेय ट्राफिक जाम

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक व्यवस्थेचे नियोजन नाही : वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळी आता जेम-तेम दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत आता बाजारात वर्दळ दिसून येत आहे. अशात मात्र वाहतूक शाखेकडून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी पावला-पावलांवर ट्राफीक जाम होत आहे. परिणामी नागरिक चांगलेच त्रासले आहेत.
गोंदियाच्या बाजारपेठेची दूरवर ख्याती आहे. म्हणूनच जिल्हाच काय लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदीसाठी येते. त्यात आता दिवाळी फक्त दोनच दिवसांवर आली आहे. अशात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात जाम गर्दी वाढली आहे. हीच बाब हेरून व्यापारीही सकाळी लवकरच दुकान उघडत असून रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ खुली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ चांगलीच गजबजून गेली आहे. अशात मात्र वाढत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून काहीच नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसते.
दिवाळीची गर्दी बघता वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियोजन केले जात होते. यात चारचाकींची पार्कींग, चारचाकींना बाजारात प्रवेश बंदी, दुचाकींची पार्कींग, ठिकठिकाणी बेरीकेड्स लावून वाहतूक व्यवस्था केली जात होती. यंदा मात्र तसे काहीच दिसून येत नाही. बाजारात जास्त प्रमाणात नागरिक दुचाकीनेच येणे पसंत करतात. त्यामुळे दुचाकींची गर्दी जास्त असते. अशात मात्र एखादी चारचाकी बाजारात शिरली की ट्राफीक जाम होत असून नागरिकांना अडकून पडावे लागते. नेमकी हीच समस्या आता बाजारात पावला-पावलांवर दिसून येत आहे. चारचाकी सर्रास शिरत असल्याने शिवाय रस्त्यांवर वाहन उभी केली जात असल्याने ट्राफिक जाम होत आहे.

हॉर्नच्या आवाजाने डोकेदुखी
वेळोवेळी होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक अडकून पडतात. त्यात वाहनांची गर्दी वाढते. अशात काही जास्त घाई असणारे सतत हॉर्न वाजवून आपली घाई दाखवून देतात. अशात मात्र गर्दीतील अन्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. सध्या हाच प्रकार बाजारात बघावयास मिळत आहे. मात्र वाहतूक पोलीस दिसून येत नाही.

Web Title: There are traffic jams in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.