सस्पेन्स संपला, गोंदियात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट; भाजप, राकाँकडून कोण आहे रिंगणात?

By अंकुश गुंडावार | Updated: November 17, 2025 13:29 IST2025-11-17T13:27:47+5:302025-11-17T13:29:13+5:30

Gondia : सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करुन एबीफार्म देण्याचे नियोजन केले होते.

The suspense is over, the picture of the candidates for the post of mayor in Gondia is clear; Who is in the fray from BJP and NCP? | सस्पेन्स संपला, गोंदियात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट; भाजप, राकाँकडून कोण आहे रिंगणात?

The suspense is over, the picture of the candidates for the post of mayor in Gondia is clear; Who is in the fray from BJP and NCP?

गोंदिया : नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरुन गेल्या दहा दिवसांपासून सस्पेन्स कायम होता. हा सस्पेन्स अखेर सोमवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाला आहे. गोंदिया नगर परिषद  नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून कशिश जयस्वाल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ. माधुरी नासरे आणि काँग्रेसकडून सचिन शेंडे तर शिंदेसेनेकडून डॉ. प्रशांत कटरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता मंगळवारपासून निवडणुकीच्या  रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. 

सर्वच पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करुन एबीफार्म देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही अपेक्षित उमेदवारांना संधी मिळाली तरी काहींची भ्रमनिराशा झाल्याने ऐनवेळी बंडखोरी करीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाकडून आ. विनोद अग्रवाल व डाॅ. परिणय फुके यांच्या मर्जीतले माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली. तर आम आदमी पार्टीकडून उमेश दमाहे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे जेष्ठ नेते राहिलेले डाॅ. प्रशांत कटरे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेचे आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करुन सोमवारी शिंदेसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या डॉ. माधुरी नासरे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. तर काँग्रेसने
ऐनवेळी माजी नगरसेवक सचिन शेंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन घेत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. एकंदरीत सर्वच  प्रमुख पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

कटरे यांना दुसऱ्यांदा डावलल्याची चर्चा 

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आरोग्य भारतीचे गोंदिया जिल्हा प्रमुख डाॅ. प्रशांत कटरे यांना भारतीय जनता पक्षाच्या नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील आ. नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीतही डावलले होते. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाकरीता पक्षाकडे अर्ज करुन उमेदवारी मागितली. परंतु पक्षाच्या नागपूर, गोंदिया व देवरीतील नेत्यांनी निष्ठावंत व नवीन चेहरा असलेल्या डाॅ.प्रशांत कटरे यांना नकार दिल्याची चर्चा आहे.

Web Title : गोंदिया नगर पालिका अध्यक्ष पद के उम्मीदवार तय: भाजपा, राकांपा, कांग्रेस, शिंदे सेना मैदान में।

Web Summary : गोंदिया नगर पालिका चुनाव की तस्वीर साफ। भाजपा, राकांपा (अजित पवार), कांग्रेस और शिंदे सेना ने अध्यक्ष पद के लिए अपने उम्मीदवारों की घोषणा की। चुनावी जंग शुरू।

Web Title : Gondia Municipal President Candidates Finalized: BJP, NCP, Congress, and Shinde Sena Field Candidates.

Web Summary : Gondia's municipal election picture is clear. BJP, NCP (Ajit Pawar), Congress, and Shinde Sena announced their candidates for the president post. The election battle begins.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.