वाघ नदीला पूर, बोटीची व्यवस्था न झाल्याने धानोली येथील दिहारी कुटुंब संकटात
By अंकुश गुंडावार | Updated: August 15, 2022 23:01 IST2022-08-15T23:00:45+5:302022-08-15T23:01:56+5:30
दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.

वाघ नदीला पूर, बोटीची व्यवस्था न झाल्याने धानोली येथील दिहारी कुटुंब संकटात
गोंदिया - सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला आणि कालीसरार, तसेच देवरी तालुक्यातील सिरपूर या तिन्ही धरणांचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे वाघ नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान धानोली येथील दिहारी कुटुंब वाघनदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या शेतात अडकून पडले आहे. १५ ऑगस्टच्या सायंकाळी उशिरापर्यंत बोटेची व्यवस्था न झाल्याने हे कुटुंब तेथेच अडकून आहे. मात्र, पाण्याची पातळी आणखी वाढली तर या कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ शकते.
हे कुटुंब शेतात मकान (घर) बनवून राहत आहे. त्यांच्या मकानाला पुराच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढले आहे. गेल्या ३५ तासांपासून संकटात सापडलेल्या दिहारी कुटूंबाला सुखरूप बाहेर आणण्यासाठी गावातील काही युवक प्रयत्न करत रस्सी आणि ट्युबच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत गेले. परंतु कुटूंबातील ८० वर्षीय म्हाताऱ्याने रस्सी पकडून बाहेर येण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे त्याचा मुलगा आणि सुनेनेसुद्धा बाहेर येण्यास नकार दिला. युवकांनी त्यांची जनावरे बाहेर काढली.
दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. १५ ऑगस्टला सायंकाळी उशिरापर्यंत बोटेची व्यवस्था झाली नाही. यामुळे दिहारी कुटुंब पुरातच अडकून आहे. पाण्याची पातळी आणखी वाढली तर तिघांचा जीव धोक्यात येऊ शकते.