शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
2
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
3
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
4
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
5
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
6
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
7
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
8
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
9
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
10
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
11
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
12
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
13
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
14
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
15
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
16
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
17
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
18
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
19
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
20
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:31 IST

Gondia : महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. टीईटी पेपरच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात शंभरावर परीक्षार्थी शिक्षकांना पेपरसाठी मराठवाड्यातून कॉल आले. पेपरकरिता दीड लाख रुपयांपासून तीन लाखांपर्यंत मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) करिता रविवारी राज्यात परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील शंभरावर शिक्षकांना परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मराठवाड्यातून कॉल आले.

आणखी १० जणांवर गुन्हा

कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी आणखी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.. त्यामध्ये रोहित पांडुरंग सावंत (वय ३५, रा. कासारपुतळे, जि. कोल्हापूर), अभिजीत विष्णू पाटील (४०, रा. बोरवडे, , जि. कोल्हापूर), संदीप भगवान गायकवाड (४६, रा. बेलवाडी, जि. सातारा), अमोल पांडुरंग जरग (३८, रा. सरवडे,, जि. कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार (३५, रा. कासारपुतळे, जि. कोल्हापूर), रणधीर तुकाराम शेवाळे (४६, रा. सैदापूर,), तेजस दीपक मुळीक (२२, रा. निमसोड, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (३२, रा. खोजेवाडी, जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (४०, रा. कोपार्डे हवेली, जि. सातारा) आणि श्रीकांत नथुराम चव्हाण (४३, रा. उंब्रज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

कोणताही गैरप्रकार नाही

पुणेः काही ठिकाणी परीक्षेत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आल्याने परीक्षा रद्द तर होणार नाही ना, अशी चिंता परीक्षार्थीना वाटत होती. याबाबत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा दावा करून परीक्षार्थीनी चिंता करू नये, असेही आश्वासित केले.

चौकशी समिती स्थापन

नाशिक जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांसाठी मराठी पेपर दिल्याच्या प्रकरणाची राज्य परीक्षा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. सीडीओ मेरी शाळेतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचे माध्यमातून समोर आले. सुमारे ४५० विद्यार्थ्यांना इंग्रजीऐवजी मराठीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची नोंद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TET Paper Leak: Calls to Gondia Teachers, Lakhs Demanded

Web Summary : Before the TET exam, a paper leak racket was exposed in Kolhapur. Gondia teachers received calls from Marathwada demanding ₹1.5-3 lakhs for the paper. Police filed charges against ten more individuals. Officials claim no malpractice occurred in the exam.
टॅग्स :examपरीक्षाTeachers Recruitmentशिक्षकभरतीEducationशिक्षणkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र