शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसानंतर जिल्ह्यात एका कोरोना बाधिताची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मागील दहा दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता. तर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र जिल्हावासीयांसाठी हा आनंद केवळ एका दिवसा पुरताच मर्यादित ठरला. दुबईहून तिरोडा तालुक्यात स्वगृही परतलेला एका तरुणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देदुबई प्रवासाची हिस्ट्री : केवळ एकच दिवस जिल्हा राहिला कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधित रुग्ण बुधवारपर्यंत (दि.१०) कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून तिरोडा तालुक्यात आलेला एका जणाचा स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ७० वर पोहचली असून यापैकी एक कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात मागील दहा दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता. तर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र जिल्हावासीयांसाठी हा आनंद केवळ एका दिवसा पुरताच मर्यादित ठरला. दुबईहून तिरोडा तालुक्यात स्वगृही परतलेला एका तरुणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना बाधिताचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११९० जणांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ७० स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून १०९१ स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.तर २९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. विशेष म्हणजे मागील दहा दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता.बाहेरुन येणाऱ्यांवर बारीक नजरजिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होवू नये यासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यावर बारीक नजर ठेवली जात असून त्यांची जिल्ह्याच्या सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य तपासणी केली जात आहे. तर बाहेरील देशातून येणाऱ्या थेट शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या