दहा दिवसात ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:34+5:30

मुंबई, पुणे इतर मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेले मजूर आपल्या स्वगृही परतले. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात ४४ हजार नागरिक दाखल झाले. तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रेड झोन क्षेत्रातून आलेल्यांमुळे १९ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्याच दिवशी दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.

In ten days 52 corona infected corona free | दहा दिवसात ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त

दहा दिवसात ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देशुक्रवारी पुन्हा दोन जण कोरोनामुक्त : जिल्ह्यात आता १७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात तब्बल आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत ६९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी (दि.५) पुन्हा दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने दहा दिवसांच्या कालावधी एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची सख्या ५२ वर पोहचली असून जिल्ह्यात आता एकूण १७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा देणारी ही बाब आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बाहेरील राज्य आणि जिल्ह्यात अडकलेले नागरिक त्यांच्या स्वगृही परतले. यामध्ये सर्वाधिक मजुरांचा समावेश आहे. मुंबई, पुणे इतर मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेले मजूर आपल्या स्वगृही परतले. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात ४४ हजार नागरिक दाखल झाले. तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रेड झोन क्षेत्रातून आलेल्यांमुळे १९ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्याच दिवशी दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत गेल्याने आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६९ रुग्णांची नोंद झाली.
कोरोना बाधित आढळलेले रुग्ण हे प्रामुख्याने ग्रामीण भागातील अधिक होते. शिवाय या सर्वांना मुंबई, पुणे, दिल्ली येथील प्रवासाची हिस्ट्री होती. बाहेरील जिल्हा अथवा राज्यातून आपल्या स्वगृही परतल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि प्रशासनाला देत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला होता. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात सुध्दा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व कोरोना बाधित रुग्णांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते.
कोरोना बाधित हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने आणि त्यांची रोगप्रतिकार क्षमता देखील चांगली असल्याने ते लवकर बरे होत आहे. यामुळेच मागील दहा दिवसांच्या कालावधी जिल्ह्यातील एकूण ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे निश्चितच ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता आठवडाभरात गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

सीमेवरच तपासणीची मदत
बाहेरुन येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता प्रशासनाने यापासून धडा घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा आणि राज्य मार्गावर सीमा तपासणी नाके उभारुन त्या ठिकाणी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होत आहे.
अशी आहे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या
जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात २८ मे रोजी २, २९ मे रोजी २५, ३० मे ४, ३१ मे ६, १ जून रोजी ६,२ जून रोजी ४, आणि ३ जून रोजी २, ५ जून रोजी २ असे एकूण ५२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.

Web Title: In ten days 52 corona infected corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.