शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्रीच्या घरात

By admin | Updated: June 8, 2014 00:01 IST

शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात

गोंदिया : शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ४५.१ एवढी तापमानाची नोंद घेण्यात आली होती. मागील दिवसांत मात्र हा रिकॉर्ड तुटला असून आता पारा ४५.३ च्या घरात गेल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे. तर कमाल तापमानासह किमान तापमान सुद्धा चढले असून २९.८ एवढी नोंद घेण्यात आली आहे.
एप्रिलच्या सुरूवातीच्या पंधरवड्यानंतर उन्हाळा आपल्या रंगात आला, तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यावर्षी ३१ मे रोजी सर्वाधिक तापमान ४५.१ अं.से. पेक्षा जास्त नोंदविण्यात आले. यामुळे उष्णतेच्या लाटेने जनजीवनावर तीव्र परिणाम झाला. दुपारी १२ वाजतानंतर घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शहरातील रस्ते व बाजारपेठ १२ ते ५ या वेळेत सामसूम असते. एकंदरीत शहरात अघोषित संचारबंदी असते. गेल्या आठ दिवसांपासून सतत गोंदियाचे तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहत असल्यामुळे दुपारी १२ वाजतानंतर कोणीच घराबाहेर पडताना दिसत नाही.
नवतपाचा हा कहर म्हणता आला असला तरीही आता नवतपा नसतानासुद्धा तापमान वाढतच चालले आहे.  कारण ६ जून रोजी कमाल तापमान ४५.३ अं.से. नोदण्यात आले होते. तर उन्हाची तीच दाहकता ७ जून रोजीही दिसून आली. ७ जून रोजी कमाल तापमान ४५.३ एवढे नोंदण्यात आले. विशेष म्हणजे किमान तापमानही चांगलेच वाढल्याचीही नोंद घेण्यात आली. कमाल तापमान २९.८ अं.से. एवढे नोंद घेण्यात आले. उष्णतेच्या या लाटेने गोंदिया चांगलाच तापत असून अशात कुलरसुद्धा काम करीत नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
उष्णतेचा कोप सुरू असतानाच त्यात वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन जखमेवर मिठाचे काम करीत आहे. उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. तर भारनियमनामुळे घरात जीव गुदमरू लागला असून नागरिकांसाठी इकडे-आड व तिडके विहीर अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
मान्सून आणखी चार दिवसांनी दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे आणखी चार दिवस या भट्टीत काढावेच लागणार आहेत. यात ही  विशेष बाब म्हणजे दिवस तर कडक उष्णतेत कापावा लागतच आहे. मात्र   किमान तापमानही २९.८ अं.से. पर्यंत  पोहोचल्याने रात्रीही उष्ण लपटांचे चटके बसतच आहे. आता असह्या झालेल्या या उष्णतेपासून मुक्तता मिळावी यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)