शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, माझी काही चूक झाली का ?

By admin | Updated: March 14, 2016 01:46 IST

मी नेहमीसारखी शेळ्या चारत होती. मी नाही म्हटले असतानाही विवेक, विक्की अन् शेजारचं एक पोर सोबत खेळत तिकडे शेताकडे आले.

विक्कीच्या आजीचा सवाल : भेटी देणाऱ्यांच्या गाड्यांच्या धुराळ्याने माखले राकामनोज ताजने गोंदियामी नेहमीसारखी शेळ्या चारत होती. मी नाही म्हटले असतानाही विवेक, विक्की अन् शेजारचं एक पोर सोबत खेळत तिकडे शेताकडे आले. तिथे बोअरचा खड्डा खोदला आहे याची कल्पनाही मला नव्हती. तिकडच्या पाळीकडे चरत गेलेल्या एका शेळीला आणण्यासाठी मी गेली अन् त्याचवेळी भूकंप झाल्यासारखा आवाज झाला. विक्की खड्ड्यात पडल्याचं सांगत विवेक अन् त्याच्यासोबतचं पोर धावत माझ्याकडे आले. पण असा काही भयंकर प्रकार होईल याचा कधी विचारही केला नव्हता. सांगा, यात माझी काही चूक झाली का? असा आर्त सवाल बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या विक्कीची आजी सिंधूबाई दोनोडे हिने केला.या घटनेच्या एकमेव सज्ञान साक्षीदार असलेल्या सिंधूबाई शनिवारी या दुर्घटनेचा घटनाक्रम सांगत होत्या. आपल्या दुर्लक्षामुळेच नातवाचा जीव गेला असे लोकांना वाटेल, या अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त असलेल्या सिंधूबाई आपली बाजू स्पष्ट करीत होत्या.विक्की खड्ड्यात पडल्याचे सांगताच सिंधूबाई तिकडे धावल्या. त्यांनी खड्ड्यात डोकावून पाहीले, विक्कीला आवाज देऊन पाहीले, पण ना त्यांच्या आवाजाला विक्कीकडून काही प्रतिसाद आला, ना त्याच्या रडण्याचा आवाज आला. अतिशय खोलवर जाऊन तो फसला होता. वस्तुस्थितीची कल्पना येताच सिंधूबाईला तिथेच चक्कर येऊ लागली. कशीबशी पोरं गावाकडे आली, अन् ही खबर गावभर पसरून मदतकार्य सुरू झाले. पण अखेर विक्कीला वाचविण्यात मात्र यश आले नाही.