पंचायत समितीवर शिक्षकांची धडक
By Admin | Updated: March 30, 2015 01:11 IST2015-03-30T01:11:28+5:302015-03-30T01:11:28+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या देवरी शाखेच्यावतीने जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, जिल्हा सहसचिव संदीप तिडके, ...

पंचायत समितीवर शिक्षकांची धडक
देवरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या देवरी शाखेच्यावतीने जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, जिल्हा सहसचिव संदीप तिडके, तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर व कार्याध्यक्ष जी.एच. बैस यांच्या नेतृत्वात पंचायत समितीमधील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन १५० च्या वर शिक्षकांनी २६ मार्च रोजी पंचायत समितीवर धडक दिली. गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांच्या दालनात घडलेल्या चर्चा दरम्यान आठ दिवसांत शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन त्यांनी शिक्षकांना दिले. यावर ३१ मार्च रोजी आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलन स्थगीत करण्यात आले.
सहाव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता जमा करणे, नियमित झालेल्या निमशिक्षकांची थकबाकी काढणे, शालेय पोषण आहार, इंधन, भाजीपाला खर्च व मदतनिसांचे मानधन फेब्रुवारीपर्यंत काढणे, सेवापुस्तिका अद्ययावत करणे, चटोपाध्याय व निवडश्रेणीचे प्रस्ताव जिल्हापरिषदेकडे पाठविणे, उच्च परीक्षेला बसण्याचे अर्ज जिल्हापरिषदेकडे पाठविणे, पुरवणी बिले काढणे, डी.सी.पी.एस.ची प्रकरणे निकाली काढणे, प्रवासभत्ता देयके काढणे, अर्जित रजा प्रकरणे मंजूर करुन सेवापुस्तिकेत नोंद घेणे, नरेंद्र अमृतकर यांची जीपीएफ कपात पाठविणे, संजीव मेश्राम यांचे रजा प्रकरण निकाली काढणे आदी मागण्यांना घेऊन शिक्षकांनी पंचायत समितीवर धडक दिली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी भांडारकर यांच्या दालनात मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेला गटशिक्षणाधिकारी भांडारकर यांच्यासह एल.यू. खोब्रागडे, गजानन पाटणकर, संदीप तिडके, जी.एस.बैस, सुरेश कश्यप, नरेश बडवाईक, एल.यू. तवाडे, एस.जी. चांदेवार, डी.एम. कापसे, गणेश राठोड, मांढरे, ओ.आर. दखणे, तेजराम नंदेश्वर, संदीप खेडीकर, ईश्वर माहुले, किशोर ब्राम्हण, प्रकाश गावळ, पंचायत समिती सदस्य ओमराज बहेकार, शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. येटरे व वरिष्ठ सहायक फुळसाय उपस्थित होते.
चर्चेदरम्यान गटशिक्षणाधिकारी भांडारकर यांनी आठ दिवसात संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन दिले. यावर मात्र शिक्षक समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रसंगी आर.डी. बारापात्रे, पुरुषोत्तम गहाणे, नरेंद्र अमृतकर, विरेंद्र खोटेले, उत्तम टेंभुरकर, प्रदीप बडोले, पंकज राठोड, प्रकाश गावळ, भागवत भोयर, मोवाडे, लांजेवार, बी.आर. खोब्रागडे, नरेंद्र राणे, प्रवीण सरगर, संजय कुऱ्हे, संजय राऊत, गोरक्ष कत्करे, आर.एस. रघुर्ते, बी.सी. टेंभरे, अरुण वैद्य, तपेश काशीवार, एस.ए. वासनिक, बोरकर, मिथून चव्हाण, घुगे, नरेंद्र राणे, बारसे, सलामे, मेळेसर, गेडाम, दिगंबर नंदनवार तसेच समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)