शेतकºयांसाठी तालुका काँग्रेसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:56 IST2017-11-11T21:56:26+5:302017-11-11T21:56:39+5:30

सध्या केंद्रात व महाराष्टÑ राज्यात भाजपाचे सरकार आहे. या सरकारला सत्तेत येवून अडीच ते तीन वर्षाचा कालावधी झाला.

Taluka Congress statement for farmers | शेतकºयांसाठी तालुका काँग्रेसचे निवेदन

शेतकºयांसाठी तालुका काँग्रेसचे निवेदन

ठळक मुद्देउभी पीके झाली नष्ट : संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : सध्या केंद्रात व महाराष्टÑ राज्यात भाजपाचे सरकार आहे. या सरकारला सत्तेत येवून अडीच ते तीन वर्षाचा कालावधी झाला. वर्तमान सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यास शासन अपयशी ठरत आहे. गेल्या तीन वर्षात देशात व राज्यात अच्छे दिन आलेच नाही. शासनाला जनतेच्या प्रश्नाविषयी जाग यावी, म्हणून अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भागवत नाकाडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन नायब तहसीलदार वाढई यांना देण्यात आले.
सध्याच्या परिस्थितीत शेतकरी व शेतमजूरांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात काही भागात पाऊस पडला नसल्याने जमिनी पडीक राहिल्या. काही भागात अवकाळी पाऊस आणि कीेडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.
मागील महिन्यात नवेगाव व महागाव मंडळात चक्रीवादळ आल्याने हजारो हेक्टर मधील उभी पिके पूर्णत: नष्ट झाली. अशा स्थितीत शेतकºयांकडे सहानुभूतीने पाहणारा कुणी उरलाच नाही. शासनाचा किंवा पिक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकºयांकडे फिरकला नाही. ज्या शेतकºयांकडे विद्युत पंप आहेत, वीज देयक थकीत आहे. त्यांचे वीज कनेक्शन कापण्याचे संबंधित विभागाकडून आदेश मिळाले आहेत. अशा बिकट परिस्थिती शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे.
यासंदर्भात अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन तहसील कार्यालयाच्या मार्फत पाठविण्यात आले. गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पिकांचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना विशेष अनुदान जाहीर करावे, पिक विमा कंपनीला विमाधारकांचे प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे आदेश देण्यात यावे. कर्ज मुक्तीचा लाभ सरसकट द्यावा, जलयुक्त शिवार योजनेचे काम एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत मजुरांकडून करावे, जेसीबी मशिनने करु नये, जिल्ह्यात पूर्वी प्रमाणेच एपीएल, बीपीएल व अंत्योदय कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेच्या मापदंडानुसार धान्य मिळावे, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज पूर्वी प्रमाणेच सरळ स्विकारण्यात यावे. आॅनलाईनची अट रद्द करण्यात यावी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकाºयांचे कार्यालय जे गावाचे बाहेर एका गटात आहे ते अत्यंत त्रासाचे आहे. हे कार्यालय गावात रेल्वेस्थानक, बसस्थानक किंवा तहसील कार्यालयाच्या आजुबाजूला योग्य ठिकाणी जागा शोधून स्थलांतरीत करण्यात यावे. अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल, उपसभापती आशा झिलपे, अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, सोमेश्वर सोनवाने, लता वालदे, सुभाष देशमुख, जगदीश पवार, गणपत राऊत, नरेश गहाणे, भाग्यश्री सयाम, नमीता राऊत, इंद्रदास झिलपे, संतोष नरुले, चेतन शेंडे, रविंद्र खोटेले, संजय मानकर, लिलाधर ताराम, युवराज ईश्वार, नाशीक शहारे, नरेश बुडगेवार, सुजाता बुडगेवार, हरिराम पुराम, मोरेश्वर सोनवाने, टिकाराम मरस्कोल्हे यांचा समावेश होता.

Web Title: Taluka Congress statement for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.