मोबाईलवर बोलणे चारशे वाहन चालकांना पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:15+5:30

मोबाईल आजघडीला अत्यावशक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाईलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.

Talking on mobiles, four hundred drivers got expensive | मोबाईलवर बोलणे चारशे वाहन चालकांना पडले महागात

मोबाईलवर बोलणे चारशे वाहन चालकांना पडले महागात

ठळक मुद्देजीवावर बेतू शकतो प्रकार : वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोक्याचे असते. मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यातील वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलवर बोलताना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यात ४०० वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे मोबाईलवर बोलणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडले.
वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त असते हे वाहन चालकांना माहिती असतानाही मोठ्या प्रमाणात वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलवर बोलतात. यामुळे अपघात घडतात.
मोबाईल आजघडीला अत्यावशक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाईलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवू नये किंवा वाहन चालवितांना कुणाचा फोन आला तरीही त्या फोनला उचलू नये असे वाहतूक नियम असताना वाहन चालक त्या नियमाला मोडून आपल्याच धुंदीत वाहन चालवित मोबाईलवर बोलून इतरांचा बळी घेतात.अशा हलगर्जीपणा करणाऱ्या वाहन चालकांना धडा शिकवावा म्हणून जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सन २०१९ यावर्षात जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाहन चालवितांना मोबाईलवर बोलताना ४०० वाहन चालकांना पकडून त्यांच्याकडून ८० हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोबाईलवर बोलताना आढळल्यास त्या वाहन चालकांकडून प्रत्येकी २०० रूपये दंड घेतला आहे.

सर्वाधिक कारवाई डिसेंबर महिन्यात
गोंदिया जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालक वाहन चालवितांना मोबाईलवर बोलून वाहतूक नियमाचे उलंघन करताना वर्षभरात प्रत्येक महिन्यात आढळले. परंतु डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कारवाई मोबाईलवर बोलणाºया वाहन चालकांची आहे.तब्बल १७७ वाहन चालक एकट्या डिसेंबर महिन्यात आढळले आहेत.त्यात जानेवारी महिन्यात ३, फेब्रुवारी महिन्यात ४,मार्च महिन्यात २, एप्रिल १०, मे २५, जून ५१, जुलै ३०, आॅगस्ट २२, सप्टेंबर ८, आॅक्टोबर ४ व नोव्हेंबर ६४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहन चालविताना मोबाईचा वापर करू नये. वाहन चालविताना मोबाईलकडे नजरही टाकल्यास डोके मोबाईलमध्ये गुंतून जाते. परिणामी अपघात होते. दंडाच्या भीतीपोटी नाही तर सुरक्षितता म्हणून वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये.
- दिनेश तायडे,
पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया.

Web Title: Talking on mobiles, four hundred drivers got expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.