कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:37+5:30
जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांचे आवागमन सुरू असून राजकीय दबावाखाली ७ ही दिवस बाजार खुले करण्यात येऊन गर्दीला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे झोनमध्ये असलेला गोंदिया जिल्हा ऑरेंज-रेड झोन मध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही. शिवाय, ग्रामीण भागात आजही ग्रामीण प्रशासनाचा प्रभाव कमी दिसत आहे. ग्रामीण भागातील प्रशासनावर बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती त्वरीत जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचवावी अशी सक्ती करायला हवी.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक उपाययोजना करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य व जिल्ह्यात विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यात आतापर्यंत जिल्ह्याला यश आले असून ३८ दिवसांत एकही नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला नसल्यामुळेच जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. पण आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने गोंदिया जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे. आता गोंदिया जिल्ह्यात सुध्दा दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासनाने यावर कडक उपयायोजना कराव्या अशी मागणी संविधान मैत्री संघाने केली असून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांचे आवागमन सुरू असून राजकीय दबावाखाली ७ ही दिवस बाजार खुले करण्यात येऊन गर्दीला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे झोनमध्ये असलेला गोंदिया जिल्हा ऑरेंज-रेड झोन मध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही. शिवाय, ग्रामीण भागात आजही ग्रामीण प्रशासनाचा प्रभाव कमी दिसत आहे. ग्रामीण भागातील प्रशासनावर बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती त्वरीत जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचवावी अशी सक्ती करायला हवी. त्यासाठी त्यांना केलेल्या कार्याचा अहवाल मागण्याची सूचना द्यावी. यावरून जिल्हा प्रशासनाला ग्रामीण प्रशासनाच्या कार्य व जबाबदारीची जाणीव तपासता येईल. शासकीय विभागातील विविध कार्यालय, बँकिग क्षेत्रातील कर्मचाºयांनी आम जनतेची कामे लवकर उरकण्यासाठी गती वाढवणे गरजेचे असून तसे आदेश काढणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे. उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले असून याप्रसंगी संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक पुरु षोत्तम मोदी, समता सैनिक दल कमांडर राजहंस चौरे, ओबिसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, बहुजन युवा मंचचे सुनील भोंगाडे प्रामुख्याने उपस्थीत होते.
बाहेरून येणाऱ्यांसाठी कडक निर्णय करा
जिल्ह्यात पर राज्य व जिल्ह्यातून नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत असली तरी नजरचुकवून आवागमन सुरु आहे. परिणामी जिल्ह्यात धोक्याची घंटा वाजत आहे. अशात वेळेवर कारगर उपाययोजना व कडक निर्णय घेऊनच जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्या.
निवेदनातून दिल्या या सूचना
आजची परिस्थिती बघता बाजार आठवड्यातून फक्त ३ दिवस सुरू ठेवावे. रस्ते, बाजार, कार्यालय परिसर व अन्य ठिकाणी होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करावी. मास्क फिरणाऱ्यांवर, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर, सुरक्षा उपाय न करणाऱ्यांवर कडक कारवाई करयात यावी. गर्दीच्या ठिकाणी वेळेचे नियोजन असावे. व्यापारी वर्ग, लघु व कुटीर उद्योगांना ठरवून बंधनकारक करावे. दुकान उघडण्याची सवलत असणाऱ्यांनी दुकानासमोर सॅनिटायझर किंवा हात धुण्याची सोय करून द्यावी. जीवनावश्यक वस्तू सोडून ज्या वस्तूंची गरज नाही (उदा. कापड, सौंदर्य प्रसाधन, भांडे इत्यादी) अशी दुकाने बंद ठेवावी.