विहिरीचे पाणी दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:41+5:302021-01-13T05:15:41+5:30
तिरोडा : उत्तम आरोग्यासाठी पिण्याचे पाणी शुद्ध असावे, पण तालुक्यातील मांडवी येथील शासकीय विहिरीचे पाणी दूषित करून नागरिकांचे आरोग्य ...

विहिरीचे पाणी दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा
तिरोडा : उत्तम आरोग्यासाठी पिण्याचे पाणी शुद्ध असावे, पण तालुक्यातील मांडवी येथील शासकीय विहिरीचे पाणी दूषित करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत. या प्रकाराकडे ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार दिनेश मारबदे यांनी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मारबदे यांनी खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील मांडवी येथील शासकीय विहिरीवर काही जण मोटारसायकल, सायकल, गाई, म्हशी, चादर, ब्लँकेटसह दैनिक वापराचे कपडे धुतात. त्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होत असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतची माहिती सरपंच व ग्रामसेवक यांना लिखित देण्यात आली आहे. मात्र त्यांनी अद्यापही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.