शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रु खमोडे उपस्थित होते.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन : सहा तासात मिळणार अहवाल, अडचण झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रयोगशाळा येथील शासकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलीे.या प्रयोगशाळेचे सोमवारी (दि.८) राज्याचे गृहमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ई उद्घाटन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रु खमोडे उपस्थित होते. यादरम्यान पालकमंत्री अनिल देशमुख यांनी या वेळी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने परिस्थितीच्या आढावा घेतला. जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण शिल्लक असल्याची माहिती घेतली तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांनी शुभेच्छा देऊन सर्वांचे कौतुक केले.पूर्वी कोरोना चाचणीसाठी सर्व नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. त्यासाठी तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या तपासणी केंद्रामुळे केवळ सहा तासात नमुने चाचणीचे अहवाल प्राप्त होतील. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा आणखी दक्षतेने सज्ज होईल असे सांगितले.पालकमंत्र्यांनी या वेळी कोरोना चाचणी प्रयोगशाळा तपासणी केंद्राची कार्यप्रणाली डॉ.दिलीप गेडाम यांच्याकडून जाणून घेतली. डॉ. गेडाम यांनी सांगितले की, या मशीनची क्षमता एका दिवसात १२० नमुने तपासणी करण्याची आहे. आॅटोमोेटेड आरएनए मशीन लवकरच येणार आहे.ती आल्यानंतर नमुने तपासणी क्षमता दुप्पट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा तपासणी केंद्राकरिता जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यातील १ कोटी ५२ लाख रुपये प्रयोगशाळेतील विविध उपकरणावर खर्च करण्यात आला आहे.दररोज १२० नमुन्यांची चाचणी शक्यया प्रयोगशाळा तपासणी केंद्राकरिता एक मुख्य तपासणी अधिकारी, तीन सहायक तपासणी अधिकारी व इतर तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.या प्रयोगशाळा तपासणी केंद्रामुळे कोरोना संशियतांचे निदान लवकर होण्यास मदत होणार आहे. या प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुन्यांची चाचणी करणे शक्य आहे.

पहिल्याच दिवशी तीन नमुन्यांची यशस्वी चाचणीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेत पहिल्याच दिवशी तीन नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या तिन्ही नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. याच नमुन्यांची नागपूर येथील एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेतून चाचपणी करण्यात आली. त्यात गोंदिया येथील प्रयोगशाळेचा अहवाल योग्य असल्याची बाब पुढे आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या