जिल्ह्यातील ३२८ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:45+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे मागील ३३ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

Swab samples of 328 people in the district are negative | जिल्ह्यातील ३२८ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

जिल्ह्यातील ३२८ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

ठळक मुद्दे३३ दिवसात नवीन रुग्ण नाही : ६५ व्यक्ती आयसोलेशन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३४३ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३२८ जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १५ नमुन्यांचा अहवाल अद्याप जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे मागील ३३ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून बाहेर जिल्ह्यातून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन उपचार केले जात आहे. सध्या गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात ६५ जण उपचार घेत आहेत. तर शासकीय क्वारंटाईन कक्षात ५६ जण उपचार घेत आहेत.
यात एम.एस. आयुर्वेदिक कॉलेज कुडवा १७, चांदोरी ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा २, उपकेंद्र बिरसी २, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा २ आणि शासकीय आश्रमशाळा इळदा २८ असे एकूण ५६ उपचार घेत आहेत.

Web Title: Swab samples of 328 people in the district are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.